आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समस्या मांडाव्या कुणासमोर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे स्थायी समितीची बैठक स्थगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीला सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रशा,सकीय अडचणी मांडाव्या कुणासमोर असा संतप्त सवाल शनिवारी (दि. १९) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्यावतीने उपस्थित करण्यात आला. दरम्यान, आजही मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने स्थायी समितीची बैठक स्थगित करण्यात आली. दरम्यान, जि. प. अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महत्त्वाच्या बैठकीला गेल्याचे सांगूनही पदाधिकाऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, सरीता मकेश्वर, वृषाली विघे, अरुणा गोरले अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीलाच अभिजिते ढेपे यांनी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे प्रश्न कुणाला विचारावे असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाशी संबंधित जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे उत्तरे कोण देणार असा सवाल ढेपे यांनी विचारला. मागील दोन बैठकींनाही मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या टेबलवर पडून असलेल्या फाईलचे नेमके काय झाले याचे उत्तर कोण देणार याची विचारणा केली. उत्तरे देण्यासाठी जबाबदार अधिकारीच अनुपस्थित राहत असतील तर बैठकींना काय अर्थ असे ढेपे म्हणाले. त्यानंतर बबलू देशमुख यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल अध्यक्ष सतीश उईके यांना विचारणा केली. यावर उईके म्हणाले, सीईओंना महत्त्वाची बैठक असल्याचे त्यांनी मला फोनवरून सांगितले. यावर सातत्याने दोन बैठकांनाही सीईओ अनुपस्थित असल्याचे देशमुख यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सीईओ वांरवार बैठकीला अनुपस्थित राहत असल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बैठक स्थगित करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली. पुढीला बैठकीला सीईओंनी बैठकीला उपस्थित राहावे असेही ते म्हणाले. यावर अध्यक्षांनी कामकाज पुढे सुरू करा असे म्हटले. त्यानंतर कामकाज पुढे सुरू करू नका सभा स्थगित करा अशी मागणी देशमुख यांनी केली. त्यानंतर ठीक आहे, असे म्हणत अध्यक्ष उईके यांनी बैठक स्थगित करण्यात येत असल्याचे सांिगतले. त्यामुळे दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुरू झालेली स्थायी समितीची बैठक अर्ध्या तासातच गुंडाळण्यात आली. त्यामुळे आपल्या भागातील विविध प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी बैठकीला आवर्जून हजर असलेल्या सदस्यांचा हिरमोड झाला.

जलव्यवस्थापन समितीची बैठकही केली तहकूब
जिल्हापरिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीचे शनिवारी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देता आली नाही. आर्थिक अनियमीततेचे गंभीर मुद्दे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे संबधित प्रकरणांची संपूर्ण माहिती घेऊन बैठकीला या, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बांधकाम विभागाकडे त्यासंबंधीची माहिती नसल्यामुळे ही बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धामणगाव गढीचे सचिव पदाधिकारी दोषी
धामणगाव गढी ग्रा.पं.तील कथित प्रकरणाच्या चौकशीचे काय झाले असा प्रश्न बबलू देशमुख यांनी विचारला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात सचिव पदाधिकारी दोषी आढळल्याचे सांगितले. त्यावर दोषींवर काय कारवाई करणार असा प्रश्न देशमुखांनी विचारला असता कारवाईचे अधिकारी सीईओंना असल्यामुळे या संबंधिताचा निर्णय तेच घेतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र, सीईओच गैरहजर असल्याने नेमकी काय कारवाई करणार याचे उत्तर अधिकाऱ्यांजवळ नसल्यामुळे सभा तहकूब करण्याची मागणी देशमुख यांनी केली.

नांदगाव पेठच्या ग्रामसेवकाने तलाव विकला!
नांदगावपेठ येथील ग्रामसेवकाने तलाव विकला असल्याची बाब सुधीर सुर्यवंशी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा परिषदेच्या मालकीचा असलेला हा तलाव विकण्याचा परस्पर अधिकार नसताना सचिवाने मात्र तलावच विकण्याचा प्रताप केल्याचे सुर्यंवशी यांनी सभागृहाला सांगितले. यावर संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...