आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने २४ तास सतर्क राहावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गतचार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली असून, नदी नाल्यांना पूर आले आहेत. अशात जिल्हा आपत्त व्यवस्थापनाने सतर्क राहून जीवितहानी टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत उपस्थित सर्वच विभागाच्या प्रमुखांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता जाधव, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, रेडक्राॅस सोसायटीचे डाॅ. मुरके, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अग्निशमन विभागाचे भारतसिंग चव्हाण, तहसीलदार सुरेश बगळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पा. आडे, उपजिल्हाधिकारी सिद्धभट्टी, जयंत देशपांडे, आर.डी.काळे, शिरभाते, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, तिवसा येथील उपविभागीय अधिकारी जगताप, डीएचओ डाॅ. नितीन भालेराव, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे सुरेंद्र रामेकर, अल्पेश हाते उपस्थित होते.

जिल्ह्यातील सध्याची आपातकालीन स्थिती बघता अग्निशमन विभागाने २४ तास सतर्क राहायला हवे, तसेच मनपाने शहरातील खड्डे, तुटलेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करावी. जेणेकरून रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. अपघात टाळण्यासाठी मनपाने गांभीर्याने तत्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्यातील अरुंद लहान पुलांसह सर्वच पुलांवर दोन दिवसांच्या आत ठळक अक्षरात दिसतील असे दिशादर्शक फलक लावले जातील असे आश्वासन दिले. आपत्कालीन सेवेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जेसीबी अतिरिक्त ट्रक तयार ठेवावेत तसेच त्यांचे क्रमांक नियंत्रण कक्षांना द्यावेत, अशाची सूचना देण्यात आल्या.

संततधार सुरू असल्यामुळे अप्पर वर्धासह चार मध्यम प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. प्रत्येक तालुक्यातील जनतेला आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक ठळकपणे प्रसिद्ध करावा यासाठी जिमाकाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

सर्पदंश कक्ष २४ तास खुला
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) सर्पदंश कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. येथे रुग्णांवर तत्काळ उपचाराची सोयही करण्यात आली आहे. याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वच तालुक्यांना कळवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले आहेत.

वीज यंत्रणा वेळेवर पोहोचावी
पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. तसेच आपतकालीन स्थितीत कधी वीजेचा पुरवठा खंडित करावा लागतो. यासाठी महावितरण कंपनीने शहरी ग्रामीण भागातील यंत्रणा वेळेवर पोहोचावी यासाठी तत्पर असणे आवश्यक अाहे. बरेचदा वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात येते त्यामुळे पोलिसांनी त्यांना सुरक्षा द्यावी तसेच शहर ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आपत्ती व्यवस्थापनाला कळवण्याचेही निर्देश देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...