आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकांबाबत अर्थमंत्री सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : केंद्र सरकारच्या चलनबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यासह या बँकांना जास्तीत जास्त चलनपुरवठा करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला दिले.

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्यानंतर यासंदर्भात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत.
बुधवारी येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यावर विधिमंडळात चर्चा झाली. त्या वेळी या चर्चेला उत्तर देताना राज्याचे शिष्टमंडळ जेटलींची भेट घेऊन याबाबत अनुकूल कार्यवाहीची मागणी करेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जेटलींना भेटले.
बातम्या आणखी आहेत...