आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मेजयसह ईशांतने गाजवली जिल्हास्तर सायकल स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भातकुली नाका येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धेत मुलांच्या गटात जन्मेजय मुगल ईशांत बिजवे यांनी तर मुलींच्या गटात प्रांजली मंजिरी यांनी बाजी मारली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या सयंुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत मुले मुलींच्या १४, १७ १९ वर्षांखालील गटातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला. १४ वर्षांखालील मुलींसाठी तर मुलांसाठी कि.मी.अंतराची ही स्पर्धा होती. १७ वर्षांखालील मुलींसाठी तर मुलांसाठी १० कि.मी. आणि १९ वर्षांखालील मुलींसाठी १० अन् मुलांसाठी १२ कि.मी. सायकल रोड शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षांखालील गटात इशांत बिजवेने जेतेपद पटकावले.
मुलींमध्ये स्वीटी पवारने अव्वल स्थान अर्जित केले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात जन्मेजय मुगलने अजिंक्यपद पटकावले. गत तीन वर्षांपासून जन्मेजयने उत्कृष्ट कामगिरीद्वारे राज्यस्तरीय स्पर्धेतही यश संपादन केले आहे. तर मुलींमध्ये नारायणदास लढ्ढा हायस्कूलच्या प्रांजली श्रीनाथने बाजी मारली. १९ वर्षांखालील मुलांच्या विभागात मोहीत पोपट तर मुलींमध्ये मंजिरी नवाथेने प्रथम क्रमांक बळकावला. सकाळी वाजता संघटनेचे उपाध्यक्ष सुमीत कलंत्री राजेश महात्मे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेदरम्यान नियमत सराव करणाऱ्या खेळाडूंनी बाजी मारली. स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचे क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा सायकलींग संघटना सचिव प्रदीप मुगल, सायकल प्रेमी राजू महात्मे, सचिंद्र मिलमिले सर्व शारीरिक शिक्षकांनी अभिनंदन केले.

सहा वर्षांपासून खेळाडूंचे यश
सायकल प्रशिक्षक प्रदीप मुगल यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या सायकलपटूंनी राज्य राष्ट्रीय स्तरावर सहा वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत जेतेपदाची हॅट्िट्रक नोंदवणारा जन्मेजय यंदा राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करेल, अशी आशा संघटनेच्या सचिवांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...