आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळबागांचे भाग्य फळफळे ना, ‘कृषी’ कडून विलंब होत असल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अचलपूरसह अंजनगांव, दर्यापूर, चिखलदरा, धारणी तालुक्यांचा समावेश - Divya Marathi
अचलपूरसह अंजनगांव, दर्यापूर, चिखलदरा, धारणी तालुक्यांचा समावेश
परतवाडा - अचलपूर उपविभागातील अंजनगांव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, धारणी, अचलपूर या पाच ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी विविध फळजातीचे १ लाख ३९ हजार ३२६ रोपे कलमांची मागणी नोंदविली असताना कृषी विभागाने केवळ ५९ हजार ७९८ रोपे कलमे वितरीत केली आहेत. त्यामुळे शेतात आखणी खड्डे करून ५७ हजार ३५१ रोपे अद्यापपर्यंत मिळाल्यामुळे या योजनेवर तालुक्यात प्रश्नचिन्ह लागले आहे. 
 
पारंपरिक पिकातून फारसा आर्थिक लाभ होत नसल्यामुळे अचलपूा्रर कृषी उपविभागातील शेतकरी मोठ्या संख्येने फळबागांकडे वळल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यात, आंबा, डाळींब, संत्रा, केळी आदी फळांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडून कलम रोपे मिळणार असल्याने शेतात आखणी करून खड्डे सुद्धा तयार केले. मात्र अजुनपर्यत या शेतकऱ्यांना रोपांचे वितरण करण्यात आले नाही. अचलपूर तालुक्यातील पथ्रोट अचलपूर कृषी मंडळाअंतर्गत ८७ हजार १०२ कलमांची मागणी करण्यात आली होती. तालुक्यातील कृषी वनविभागातील रोपवाटिकेमधून कलमा रोपे वितरीत करण्यात आले असून, शासकीय रोपवाटिकेतील कलमा रोपे संपल्या आहेत. अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालय मोर्शी येथील कृषी विभागाच्या नर्सरीतून रोपे कलमा असतांनाही शेतकऱ्यांना त्या वितरीत करण्यास विलंब केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 
 
शेतकऱ्यांचा होतोय नुसता कोंडमारा 
यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वत्र गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच फळझाडे लागवडीयोग्य वातावरण नसल्याने बिकट अवस्था शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. फळबागा लावण्यायोग्य वातावरण काही दिवसांपुरते तयार झाल्यानंतर त्वरीत योजनेच्या लाभार्थ्यांना रोपा कलमांचे वाटप होणे आवश्यक होते. परंतु प्रशासकीय दिरंगाई ,समन्वयाच्या अभावामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना कलमांचे वाटप योग्य वेळेत होऊ शकल्यामुळे इच्छा असूनही शेतकऱ्यांचा कोंडमारा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 
‘खासगी’ तील कलमा संपल्या 
अचलपूर तालुक्यात संत्र्याच्या तेरा नर्सरीनंा मंजुरी असून या नर्सरीमधील संत्रा, निंबुच्या कलम संपल्या आहेत. काही मान्यता नसलेल्या संत्रा रोपवाटिकेतील मोठ्या प्रमाणात कलमांची खरेदी करण्यात आली आहे. शासकीय रोपवाटिकेत कलमा असतांनाही त्यांचे वाटप उशिराने होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
उपविभागातील शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहणार ? 
आवश्यक कलमा रोपांची संख्या - ५७, ३५१ 
पुरवठा झालेली कलमे रोपे - ८१,९७५ 
कलमा रोपांची एकूण मागणी - १,३९,३२६ 
 
पुढील स्लाइडवर वाचा, रोपांची मागणी केली, ढिसाळ नियोजन आणि कलमा असूनही देण्यास विलंब...
बातम्या आणखी आहेत...