आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा प्रवेशाचा : ‘त्या’ विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - शासनाने ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली असून, वणी येथे ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशाचा मुद्दा मागील वर्षीपासून गाजत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा या संघटनेची स्थापना केली असून, मागील वर्षी अनेक आंदोलनानंतर लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अनुदानित तुकडीमध्ये जादा प्रवेश देण्यात आले होते. 
 
या वर्षीही ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशाचा मुद्दा एकदा पुन्हा समोर आला असून, वणी परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील ४० विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत समाविष्ट केल्याची मागणी लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा संघटनेने शिक्षण विभागाकडे केली आहे. वंचित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दोन वेळा पत्र व्यवहार करूनही शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ४० विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश मिळवून देण्याकरिता १४ ऑगस्टपासून लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल धुर्वे यांनी शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. यासोबत सर्व वंचित विद्यार्थी साखळी उपोषण करणार असून, उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्व जबाबदारी शिक्षण विभागाची प्रशासनाची राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 
 
निवेदनाची प्रत उप विभागीय अधिकारी, आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार, आमदार बाळू धानोरकर, प्रधान सचिव शालेय शिक्षण मंत्रालय , आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. पो. अधीक्षक, शिक्षण उप संचालक पालकमंत्री यवतमाळ यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.  
बातम्या आणखी आहेत...