आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : शौचालय बांधून भावाने दिली बहिणीला रक्षाबंधनाची अनोखी भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शौचालय बांधून देणाऱ्या शैलेशला ओवाळताना अनाथ बहीण. - Divya Marathi
शौचालय बांधून देणाऱ्या शैलेशला ओवाळताना अनाथ बहीण.
धारणी - रक्षाबंधनम्हणजे बहीण-भावाच्या प्रेमातील अतुट धागा. भावाने बहिणीच्या सरंक्षणाची जबाबदारी घेण्याचा संकल्प करण्याचा क्षण. रक्षाबंधनाचे औचित्य साधून अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या मेळघाटातील भावाने बहिणीच्या आत्मसन्मानाची खरी जबाबदारी ओळखून तिच्यासाठी राखीची भेट म्हणून तिच्यासाठी शौचालय बांधून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. चक्क “शौचालय “बांधून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. शैलेश मेश्राम असे या भावाचे नाव आहे. 
 
राज्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे म्हणून शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय हागणदारी मुक्त ग्राम संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी अनेकविध उपक्रम शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्याकरिता ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागातील जनतेला ग्राम पंचायतींमाफ॔त वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदानही देण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, परंतु समाजाची उदासिनता नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद यामुळे शासनाचा हा संकल्प कासवगतीने पुढे जात आहे. मात्र समाजात काही असेही वल्ली आहेत, ज्यांना या योजनेची महती पटली आहे. त्यातूनच त्यांनी स्वखर्चाने शौचालय बांधण्यास प्राधान्य दिले.
 
अनाथ असलेल्या मानस बहिणीला समाजामध्ये मानाने वावरता यावे तिचा आत्मसन्मान कायम रहावा, या उद्देशाने शैलेशने तकला रक्षाबंधनाची भेट म्हणून शौचालय बांधून दिले. सीमावर्ती मध्यप्रदेशातील जनपत पंचायत खैरी, विकासखंड बालाघाट येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्च शिक्षित असून एका सेवाभावी संस्थेत ताे मानधन तत्त्वावर कार्यरत आहे. तर आशा नावाची त्याची ही बहिण अनाथ असून परिस्थितीने गरीब आहे. सामाजिक दायित्व स्वीकारत त्याने या अनाथ बहिणीला स्व कमाईतून चाळीस हजार रुपये किंमतीचे सोई सुविधायुक्त शौचालय बांधून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली. 
 
बहिणीचा आत्म- सन्मान महत्त्वाचा 
- प्रत्येक युवती महिलेला तिचा आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो. माझ्या बहिणीच्या आत्मसन्मानाला कोणतीही ठेच पोहोचू नये म्हणून तिला ही भेट दिली. प्रत्येकाने घरी शौचालय बांधून महिलांचा सन्मान करावा.
’’ शैलेशमेश्राम, भाऊ 
 
लहानपणीच हरवले माता- पित्याचे छत्र 
नियतीच्या वज्रघातामुळे लहान वयातच शैलेशच्या मानस बहिणीच्या उोक्यावरून आईवडिलांचे छत्र हरवले. एका अपघातात त्या दोघांचाही मृत्यू झाला. आजीने अत्यंत गरीब बिकट परिस्थितीत काबाडकष्ट करीत तिचे संगोपन करीत तिला वाढविले. 
बातम्या आणखी आहेत...