आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशीला अमरावतीकरांची सुवर्ण लयलूट; २८० कारची खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वावर अमरावतीकरांनी सुवर्ण लयलूट केली. दागिण्यांचे शोरुम तसेच सराफा बाजार नागरिकांच्या गर्दीमुळे फुलून गेले. या मंगल पर्वावर सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच दोनशे ऐंशी जास्त कारची खरेदीदेखील शुक्रवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस म्हणून धनत्रयोदशी उत्सव साजरा केला जातो. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. दिवाळी उत्सवादरम्यान धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते. सुखसमृद्धी घरी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीची देखील पूजा केली जाते. मिळकतीतील थोडा का होईना पैसा शिल्लक पडावा म्हणून धनत्रयोदशीला प्रत्येकजण काही ना काही सोन्याची दागिने खरेदी करतो. मागील अनेक दिवसांपासून मंदीमुळे आलेली मरगळ धनत्रयोदशी सणाच्या निमित्ताने दूर झाल्याचे चित्र सराफा बाजारात दिसून अाले. सराफा बाजारासह शहरात नामांकित ज्वेलर्संकडून सुरू करण्यात आलेल्या शोरुममध्ये देखील नागरिकांनी दागिने खरेदी करण्यास प्राधान्यक्रम दिले. व्यापारीवर्गात या पूजेचे विशेष महत्व असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरु करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशी या दिवसास ‘यमदीपदान’ असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात, याने अपमृत्यू टळतो, असा समज आहे.धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने किंवा वाहन खरेदी करणे शुभ मानतात. सोने खरेदी केल्यास त्यात वाढ होते, अशी दंतकथा आहे. या दिवशी सायंकाळी व्यापारीवर्ग धनाचे पूजन तर आयुर्वेद शास्त्राला मानणारे धन्वंतरी देवतेचे पूजन करतात. या मुहूर्तावर व्यापारी प्रतिष्ठानचा शुभारंभ करणे शुभ मानतात.

नावीन्यपूर्ण दागिन्यांचा समावेश
^नावीन्य हा प्रतिष्ठानचे प्रतिक असून प्रत्येक वर्षी नाविण्य स्वरुपात दागिणे ग्राहकांसाठी तयार केले जातात. यावर्षी प्रतिष्ठानने कोल्हापूर येथे प्रसिद्ध असलेला ‘नावीन्य ठुसी’ हे नवीन दागिना ग्राहकांसाठी तयार केला आहे. ग्राहकांना अपेक्षीत असलेली डिझाइन तयार करुन दिली जाते.’’ दिलीपपेठे, संचालक, वामन हरी पेठे ज्वेलर्स, अमरावती.

नावीन्यपूर्ण दागिण्यांना मागणी
नावीन्यपूर्ण दागिण्यांना ग्राहकांकडून विशेष मागणी केली जात असल्याचे बाजारातील चित्र होते. पारंपरिक दागिन्यांना नवनवीन पद्धतीने ग्राहकांसमोर आणण्याचे प्रयत्न नामांकित ज्वेलर्सकडून केल्या जात आहे. यासह पेडेंट, अंगठी, नवीन प्रकारचे डोरले, कानातील दागिणे यासह विविध दागिन्यांना मागणी होती.

वाहन खरेदीही जोरात
धनत्रयोदशीच्या पर्वावर सोन्यासोबत वाहन खरेदी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आज एकाच दिवशी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारची देखील खरेदी करण्यात आली. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात कार खरेदी करीत शहराची श्रीमंती देखील प्रदर्शीत केली आहे.
बातम्या आणखी आहेत...