आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dixit, Bharati Tatte, Nabil Elected On Standing Committee Member

स्थायी समिती सदस्यपदी दीक्षित, भारती तट्टे, फहमिदा बानो नबील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: विजयाचा आनंद व्यक्त करताना विजयी उमेदवार कार्यकर्ते.
परतवाडा - अचलपूरनगर परिषदेच्या विशेष सहा समित्या तीन स्थायी समितीच्या सदस्यांची निवड सोमवारी (दि. ११) पालिकेच्या सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, मोहंमद गणी, मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली.

अचलपूर नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या सदस्यांकरिता प्रहार गटातून भारती तट्टे, एकता नगरविकास गटातून ल. ज. दीक्षित, प्रोग्रेसिव्ह फ्रंट गटातून फहमिदा बानो नबील या तीन सदस्यांची निवड करण्यात आली.

बांधकाम समितीत एकताच्या ल. ज. दीक्षित, विलास काशिकर, विश्वास गवई, प्रहार नवीन गटातून भारती तट्टे, तर प्रहार जुन्या गटातून लक्ष्मी बघेले, काँग्रेस गटातून अरुण वानखडे, प्रोग्रेसिव्ह फ्रंट गटातून कमरुन्निसा मो. शब्बीर, फहमिदा बानो इब्राहिम नबील, भाजप गटातून रूपेश ढेपे, राष्ट्रवादीतून बाबुलाल पंधरे, अपक्ष अभय माथणे, शिक्षण समितीसाठी विश्वास गवई, विलास काशिकर, संजय धमेले, नंदा चांदणे, संजय भोंडे, मो. जहीरुल हसन, अख्तरा बानो शे. युसूफ, नाजिया परवीन शाबीर अहेमद, नितीन डकरे, बाबुलाल पंधरे, कीर्ती तायडे, आरोग्य समितीमधून विश्वास गवई, संजय धमेले, बाळासाहेब वानखडे, अल्का उईके, संजय भोंडे, राजू लोहिया, कमरुन्निसा शब्बीर, नाजिया परवीन शाबीर अहेमद, नितीन डकरे, बाबुलाल पंधरे, पवन बुंदेले, नियोजन समितीसाठी संजय धमेले, बाळासाहेब वानखडे, गोपाल लुल्ला, शेख बब्बू चौधरी, लता गौर, चांद सुल्ताना, शरिफाबी मो. अन्वर, कमरुन्निसा मो. शब्बीर, शीला महल्ले, बाबुलाल पंधरे, दीपाली विधळे, महिला बालकल्याण समितीसाठी शोभा मुंगल, विश्वास गवई, दीपाली विधळे, नंदा चांदणे, लता गौर, अरुण वानखडे, अख्तरा बानो, शरिफाबी मो. अन्वर, शीला महल्ले, ममता उपाध्याय, सारिका नशिबकर, पाणीपुरवठा समितीमधून विलास काशिकर, दुर्गा सुडेवाले, गोपाल लुल्ला, संजनी नचवानी, लक्ष्मी बघेले, जहरुल हसन, शाकीर हुसैन, अख्तर बानो, रूपेश ढेपे, पवन बुंदेले या सदस्यांची निवड करण्यात आली. आता शनिवारी सभापतीची निवड होईल.

समिती सदस्य निवडीसाठी ईश्वर चिठ्ठी
अचलपूरनगर परिषदेच्या विशेष समितीमध्ये नियमाप्रमाणे प्रत्येक सदस्याची एका समितीत निवड केली जाते. मात्र, अपक्ष नगरसेविका सारिका नशिबकर यांची निवड एकाही समितीत करण्यात आली नव्हती. या वेळी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन महिला समितीत निवड करण्याची विनंती केली. या वेळी कीर्ती तायडे यांचा दोन समितीत समावेश असल्याने त्यांनी महिला समितीची मागणी केली. नशिबकर यांनीही महिला, बालकल्याण समितीचा हट्ट धरला तर ईश्वर चिठ्ठीत नशिबकर यांना तारले.