आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना अध्यक्ष सभागृह चालवतात ना मंत्री खडसेंच्या प्रश्नांमुळे सत्ताधारी अस्वस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर | अन्नऔषधी प्रशासन विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील अदानी विल्मर कंपनीवरील कारवाईसंदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या प्रश्नाच्या भडिमाराने सत्तापक्षाने विधानसभेत काही काळ अस्वस्थता अनुभवली. कंपनीच्या खाद्य तेलाच्या पाकिटांवर तेलातील घटक रक्तदाब मधुमेहावर नियंत्रणासाठी उपयुक्त असल्याचा दिशाभूल करणारा मजकूर असल्याने कंपनीला नोटीस दिली आहे. त्यावर खडसे यांनी कंपनीकडे तेल ब्लेंड करून विकण्याचा परवाना आहे काय? त्यासाठी कारवाईची वाट कशाला बघावी? असे प्रश्न विचारत सरकारलाच धारेवर धरले.

संसदेतसातत्याने सुरू असलेल्या गोंधळावर ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी बुधवारी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी गोंधळासाठी विरोधकांसोबतच सरकार लोकसभाध्यक्षांनाही जबाबदार ठरवले. ‘ना लोकसभाध्यक्ष सभागृह चालवू शकत आहेत, ना संसदीय कार्यमंत्री’ असे आडवाणी म्हणाले.

नोटबंदीच्या मुद्द्यावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तीन आठवड्यांपासून सातत्याने गोंधळ सुरू आहे. बुधवारी सभागृहात काँग्रेस तृणमूल काँग्रेसचे खासदार घोषणाबाजी करत होते. काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या बाकासमोरही आले होते. याच दरम्यान आडवाणी यांनी संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांना बोलावून विचारले,‘ सभागृहाचे संचालन अखेर कोण करत आहे? ना लोकसभाध्यक्ष सभागृह चालवू शकत आहेत, ना संसदीय कार्यमंत्री !
मी जाहीरपणे हे बोलणार आहे. दोघेही सभागृहाचे घटक आहेत. विरोधक किंवा सरकार, दोघेही सभागृह चालवण्यास असमर्थ आहेत. ते स्वत:होऊनच चालत आहे.’ या दरम्यान सभागृह १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर बैठक किती वाजेपर्यंत स्थगित झाली, असे आडवाणी यांनी लोकसभेच्या एका अधिकाऱ्याला विचारले. ‘दोन वाजेपर्यंत,’ असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर संतप्त होत अनिश्चित काळासाठीच का करत नाहीत?’ असे आडवाणी म्हणाले.

मीडिया गॅलरीकडे इशारा करत आडवाणींना शांत करण्याचा प्रयत्न : संसदीयकार्यमंत्री अनंत कुमार आडवाणींना शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले. मीडिया गॅलरीकडे इशारा करत त्यांनी ही टिप्पणी बातमी म्हणून प्रसिद्ध केली जाऊ शकते, असे आडवाणींना सांगण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...