आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ : छेड काढणाऱ्या डॉक्‍टरला महिला डॉक्‍टरांनी दिला चोप, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - येथील वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालयाच्‍या मनोरूग्ण विभागातील एका वरिष्ठ डॉक्टरने परिवेक्षाधीन महिला डॉक्टरची छेड काढली. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या इतर 10 ते 15 महिला डॉक्‍टरांनी वरिष्ठ डॉक्टरला रुग्‍णालयातच चोप दिला. या प्रकरणी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. डॉ. शरद महादेव मानोरे (वय ३३) असे त्या वरिष्ठ डॉक्टराचे नाव आहे.
नेमके काय झाले ?
> ही तरुणी ही जिल्हा रुग्णालयातील गायनेक विभागात परिवेक्षाधीन डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
> गेल्या चार दिवसांपासून या विभागाचे वरिष्ठ डॉक्टर शरद मानोरे तिची छेड काढत होता.
> जिल्हा रुग्णालय परिसरात घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरातसुद्धा डॉ. मानोरे यांनी त्या महिला डॉक्टरची छेड काढली होती.
> तेव्हापासून तो तिला रोज तिला त्रास देत होता.
> त्यानंतर मंगळवारी दुपारी वरिष्ठ डॉक्टर मानोरे याने त्‍या महिला डॉक्टरची परत छेड काढली.
> रोजच होणाऱ्या त्रासामुळे परिवेक्षाधीन महिला डॉक्टरने तिच्या सहकारी डॉक्टरांना या बाबत सांगितले.
> त्यानंतर संतप्त 10 ते 15 डॉक्टरांनी डॉक्टर मानोरे याला चांगलाच चोप दिला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आरोपी डॉक्‍टरने दिली पीडित महिलेच्‍या मित्रा विरुद्ध तक्रार... डॉक्‍टरला निलंबित करणार
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...