आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात दुहेरी हत्‍याकांड, कु-हाडीचे वार करून पत्‍नी आणि भाच्‍याची हत्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूरमध्‍ये पतीने पत्‍नी व भाच्‍याची कु-हाडीने वार करून हत्‍या केली आहे. या दुहेरी हत्याकांडाने आज नागपूर चांगलेच हादरले आहे. आरोपीने या दोघांवर कुऱ्हाडीचे घाव घातले आहेत.

50 वर्षीय गोपीबाई कांबळे आणि 10 वर्षाचा चेतन रामपुरे या मामी आणि भाच्‍याची आरोपीने हत्‍या केली आहे. या प्रकरणी शरणू कांबळेला जरीपटका पोलिसांनी अटक केल्‍याची माहिती आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी, आज (शनिवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास नारी परिसरातील तशक्षिलानगर येथे शरणू कांबळे याने त्याची पत्नी आणि भाचा चेतनची हत्या केली आहे. शरणूने पत्नीवर कु-हाडीने अनेक वार केले आहेत. तर दहा वर्षाच्‍या चेतनवर कुऱ्हाडीचे तीन वार केले. या हत्याकांडानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अजूनपर्यंत या हत्‍येचे नेमके कारण समोर येऊ शकले नाही.