आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास जलरंग वापरून केला सजीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दशरथ चंदेल म्हणजे रंग, रेषा आणि लयीवर हुकूमत असणारे चित्रकार. विशेषत: जलरंगात चित्रमालिका काढण्यात त्यांची हातोटी. १९८१ मध्ये त्यांनी चवदार तळे, रमाबाईंशी विवाह, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, पुणे करार असे बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग जलरंगात सजीव केले. ही चित्रमालिका येथील शासकीय माहिती केंद्रात एका कपाटात बंदिस्त होती. माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी ती बाहेर काढली आहे.
चंदेल यांची चित्रे रसिकांशी संवाद साधत. रामायण-महाभारतातील प्रसंग तसेच बुद्ध आणि राधेवरील त्यांची चित्रे खूप गाजली. रेषेतला तलमपणा आणि चित्रातला तरलपणा रसिकांना खूप भावला. पण चंदेल परिस्थितीमुळे नागपूरबाहेर निघू शकले नाहीत. ते कॉटन मार्केट येथील हिंदी शाळेत चित्रकला शिक्षक होते. नागपूर येथे काही दैनिकांत ते आर्टिस्ट म्हणून काम करीत. पौराणिक चित्रमालिकांत त्यांचा हातखंडा होता. १९८० ते ९० चे दशक
दशरथ चंदेल यांचे होते. चंदेल यांनी डॉ. आंबेडकरांवर चित्रमालिका काढली त्या वेळी शशिकांत दैठणकर हे माहिती संचालक तर राम घुग्गुसकर माहिती अधिकारी होते. माहिती केंद्रातर्फे या चित्रमालिकेचे पहिले प्रदर्शन भरवण्यात आले. चंदेल यांनी ही चित्रमालिका नंतर माहिती केंद्राला दिली. त्या वेळी मास मूव्हमेंट संघटनेने या चित्रमालिकेची महाराष्ट्रभर प्रदर्शने भरवली. काही काळानंतर संघटनेने ३० चित्रांची ही चित्रमालिका माहिती केंद्राला मोठ्या मिनतवारीनंतर परत केली. त्यानंतर गेली दहा-पंधरा वर्षे ही चित्रमालिका एका कपाटात बंद होती.

माउंटिंग करून प्रदर्शन
या चित्रांचे आता नव्याने जतन केले येणार आहे. त्याचे माउंटिंग करून चित्रे नवीन करण्यात येणार आहेत. चित्रकार सदानंद चौधरी यांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. 'रामचरितमानस’मधील दोह्यांवरील चंदेल यांच्या चित्रमालिकेचे दरवर्षी चित्रकूटला प्रदर्शन भरत असे. आता ही चित्रमालिका कुठे आहे, माहीत नाही.
बातम्या आणखी आहेत...