आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो अनुयायांचे महामानवास अभिवादन; पुस्तके, विविध वस्तू, रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिराचे स्टॉल्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिमराज की बेटी. - Divya Marathi
भिमराज की बेटी.
अमरावती - असंख्य अनुयायांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२६ व्या जयंती दिनी स्थानिक इर्वीन चौक येथील मुख्य कार्यक्रमात आज (१४ एप्रिल) अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्याने इर्वीन चौकाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समितीच्या वतीने या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते.
 
सूर्य प्रचंड आग ओकत असतानादेखील तापमानाची पर्वा करता मोठ्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इर्वीन चौकात एकत्र आले होते. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. डॉ. पंजाबराव देशमुख बँकेपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत महिला पुरुषांसाठी सावलीकरिता भव्य कॅरीडोर तयार करण्यात आला होता. थंड मिनरलचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मुतारी, चप्पल बुटे ठेवण्यासाठी रॅक आणि अपंग वृद्धांकरिता प्रवेशद्वारापासून ते पुतळ्यापर्यंत व्हीलचेअर आदी सुविधा करण्यात आल्या. स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पाेटे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित, शोषित पडितांचे कैवारी होते. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाचा आणि प्रज्ञेचा झराच होता. संविधान देऊन विभाजित समाजाला एका समानतेच्या धाग्यात बांधण्याचे कार्य त्यांनी केल्याने पालकमंत्री म्हणाले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक राजकीय विषमता दूर केली आहे. हजारो वर्षे जातीप्रथेत अडकलेल्या बहुजन समाजाचे प्रबोधन आणि घटनात्मक अधिकार देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. इर्वीन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी पोटे ट्रस्टद्वारे सुमारे २१ लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा पोटे यांनी यावेळी केली. खासदार आनंदराव अडसूळ यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विविध विषयांचा व्यासंग असल्याचे सांगितले.

अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी परदेशात जाऊन सखोल अभ्यास केला. पीएचडी, एमएस बॅरिस्टर ॲट लॉ, डिएससी आदी पदव्या संपादीत केल्याचे सांगितले. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रभाकर वैद्य, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, महापौर संजय नरवणे, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, मनपा आयुक्त हेमंत पवार, प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आयोजक किशोर बोरकर, ज्येष्ठ पत्रकार ॲड. दिलीप एडतकर, संजय खडसे, माजी आमदार अनिल गोंडाणे, अॅड. पी. एस. खडसे आदी उपस्थित होते. किचेन,कंदीलात देखील डॉ. बाबासाहेब : पुस्तकांप्रमाणेविविध स्वरुपाची स्टॉल्स येथे लावण्यात अाले होते. किचेन, पेन, कंदील, लॉकेटस्, मोमेंन्टो आदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या विविध स्वरुपातील वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, शहरात आयोजित करण्‍यात आलेले कार्यक्रम...
 
बातम्या आणखी आहेत...