आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरपत्रिका खरेदीची फेरचौकशी, मराठवाड्यातील आमदारांनी गाजवले विद्यापीठातील प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बारकोड उत्तरपत्रिका प्रायोगिक पद्धतीवर खरेदी करताना कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला नाही. त्यामुळे कोणावरही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तथापि सदस्यांच्या भावना लक्षात घेता या प्रकरणाच्या फेरचौकशीसाठी राज्यपालांना िवनंती करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात दिली.
अहवालात कुलगुरूंवर ठपका ठेवण्यात आला असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा प्रश्न सतीश चव्हाण यांनी केला. तर िवद्यापीठाच्या मालकीची प्रेस असताना बाहेरून छपाई का करण्यात आली? सरकार कुलगुरूंना पाठीशी घालतेय का? असे प्रश्न विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले. त्यावर तावडे म्हणाले, मी स्वत: समितीचे अध्यक्ष सर्जेराव ठोंबरे यांच्याशी बोलून माहिती घेतली. यात कोणताही घोटाळा झालेला नाही. तर निविदा न काढण्यात आल्यामुळे प्रकियेत चूक झाली.

प्रश्नांच्या उत्तरात राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपालांमार्फत कुलगुरूंना समज देण्यात येईल, असे सांगितले. मात्र त्याने सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेरचौकशी करावी असे निर्देश दिले. त्यानंतर तावडेंनी ही घोषणा केली.
बातम्या आणखी आहेत...