आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drama Of A Younger In Yavatmal In Tahesil Office

अाधी दाेनदा टाॅवरवर चढला, अाता अडकवला गळफास, युवकाचे नाट्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस (जि. यवतमाळ)- यापूर्वी दाेन वेळा टाॅवरवर चढूनही मागणी मंजूर हाेत नसल्याने इसापूर (ता. दिग्रस) येथील युवकाने बुधवारी चक्क तहसीलदारांच्या कक्षात स्वत:ला काेंडून घेतले. इतकेच नव्हे तर छताच्या पंख्याला दोरी लावून ‘मागणी मान्य करा, अन्यथा गळफास घेताे, तसेच ‘जिल्हाधिकारी अाल्याशिवाय दार उघडणार नाही,’ अशा धमक्या ताे देत हाेता. रात्री उशिरापर्यंत हा गाेंधळ सुरू हाेता.

इसापूर येथील अापल्या जमिनीवरील अतिक्रमण काढून द्यावे, अशी श्याम गायकवाडची मागणी अाहे. त्यासाठी त्याने ७ जुलै २०१४ रोजी व २९ ऑक्टोबर २०१५ रोजी वायरलेस यंत्रणेच्या टाॅवरवर चढून अात्महत्या करण्याचा इशारा दिला हाेता. तीस तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी तहसीलदार व भूमी अभिलेख उपअधीक्षक हे त्या शासकीय अतिक्रमित जमिनीचे मोजमाप करण्यास गेल्याची खात्री झाल्यावरच श्याम खाली उतरला हाेता. मात्र त्यानंतरही या जमिनीवरील अतिक्रमण न उठल्याने बुधवारी दुपारी तहसीलदारांच्या कक्षात काेणीच नसल्याची संधी साधून श्यामने स्वत:ला या कक्षात काेंडून घेतले. विशेष म्हणजे पाणी बाटली, ध्वनिक्षेपक व विषारी औषधाची बाटली अशा सर्व तयारीनिशी श्याम अालेला हाेता. याच कक्षातील फॅनला दाेर अडकवून त्याचे एक टाेक त्याने अापल्या गळ्यात अडकवले हाेतेे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तातडीने दार ठाेठावून त्याला बाहेर येण्याचे अावाहन केले. मात्र ‘जिल्हाधिकारी स्वतः येईपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही. कोणीही बळजबरीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला किंवा उघडला तर फाशी घेईन,’ अशा धमक्या ताे ध्वनिक्षेपकातून देत हाेता. त्यामुळे सर्वजण धास्तावले. रात्री उशिरापर्यंत हा गाेंधळ सुरू हाेता. वरिष्ठ अधिकारी, पाेलिसांनाही पाचारण करण्यात अाले, मात्र श्यामने दार उघडलेले नव्हते.