आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इर्विनमध्ये ‘शिदोरी’चा ‘प्रहार’, आरोग्यविषयक प्रलंबित मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरासहजिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र असलेल्या इर्विन डफरीन रुग्णालयांमधील विविध समस्या मार्गी लावण्यासंबंधी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही त्या जैसे थै असल्यामुळे प्रहारच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १२) इर्विनचे सीएस डॉ. अरुण राऊत यांच्या कक्षात ठिय्या देऊन कक्षासमोरच शिदोरी खाल्ली. दरम्यान, दोन्ही रुग्णालयाच्या विविध समस्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आरोग्य संचालकांनी बुधवारी (दि. १४) आंदोलकांना नागपुरात बोलावल्यामुळे तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालयात (इर्विन, डफरीन) आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णालयातील मनुष्यबळ खाटांची संख्या मात्र कमी असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय हाेते. वेळप्रसंगी अपेक्षित उपचार मिळू शकत नाहीत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, वॉर्ड बॉय, सफाईगार कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. इर्विन रुग्णालय ३९० खाटांचे आहे, या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढतच आहे, हीच परिस्थिती डफरीन रुग्णालयाची आहे, या ठिकाणी २०० खाटा आहेत. तसेच डफरीन इर्विनमध्ये लहान मुलांसाठी आयसीयु सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागण्यांच्या पुर्ततेसाठी प्रहारने यापुर्वीसुध्दा दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून जिल्हा शल्य चिकित्सकाकडे मागणी केली. मात्र अजूनही या समस्यांवर तोडगा निघाला नाही. अखेर प्रहारने सोमवारी सकाळी १०.३० वाजतापासून ‘सीएस’च्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. अद्यापही तोडगा निघाला नाही, या समस्यांचे निराकरण वरिष्ठ स्तरावरून केले जाऊ शकते, असे सांगितल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्याचवेळी आरोग्य संचालकांसोबत चर्चा केली. सदर समस्या तातडीने सोडवण्याबाबत आंदोलनकर्त्यांनी मागणी केली. त्यावेळी आरोग्य संचालकांनी प्रहारचे पदाधिकारी, सीएस डफरीनचे वैद्यकीय अधीक्षक यांना चर्चेसाठी बुधवारी (दि. १४) नागपूरला बोलवले आहे. त्यावेळी या समस्यांवर मार्ग निघण्याची शक्यता आहे. दरम्यान सकाळी १०.३० ते १२.३० दोन तास आंदोलनकर्त्यांनी सीएसच्या कक्षासमोरच ठिय्या दिला होता. याचठिकाणी शिदोरी बोलवून अांदोलनकर्त्यांनी जेवण केले. मात्र संचालकांनी चर्चेसाठी वेळ दिल्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष वसू महाराज, प्रदीप वडतकर, चंदू खेडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
रुग्णगेटवर, आत घेऊन जायला कोणीच नाही : कोणताहीअपघात झाला किंवा उपचारासाठी रुग्णाला इर्विनमध्ये तातडीने आणले जाते. मात्र इर्विनच्या गेटवरून आकस्मिक कक्षात रुग्णाला पोहचवण्यासाठी इर्चिवनचा कर्मचारी दिसत नाही. अनेकदा या ठिकाणी हजर असलेले समाजसेवक, वाहनांचे चालक यांनाच रुग्णाला आतमध्ये घेऊन जावे लागते. काही वेळा रुग्ण दगावण्याचे प्रकारही घडतात.

तोडगा निघाल्यास आंदोलन
-बुधवारी आरोग्यउपसंचालकांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेतही तोडगा निघाला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यासाठी १८ डिसेंबरला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात बैठक आहे. त्याच बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मात्र यानंतरचे आंदोलन हे मुंबईमध्ये होणार आहे.
वसूमहाराज, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना.
कक्षासमोर खाल्ली शिदोरी: दरम्यानप्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली शिदोरी सीएस डॉ. अरुण राऊत यांच्या कक्षासमोर खाल्ली.

‘सीएस’ला भरवला घास : आंदोलनावरचर्चेच्या आमंत्रणाशिवाय कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान प्रहारींनी शिदोरी आंदोलन केले. यावेळी प्रहारच्या कार्यर्त्यांनी सीएस डॉ. अरुण राऊत यांना शिदोरीतील घास भरवला. या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न करावा, असेही यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘सीएस’ला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...