आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात पिण्याचे पाणी झाले हिरवे; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काविळीची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्याची उपराजधानीत मागील अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणी पाहून प्रशासनही थक्क झाले आहे. या मुद्द्यावर मनपातील विरोधक संतापले. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. महापौर नंदा जिचकार यांनीही अद्याप नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील भगवाननगर व बँक कॉलनी तसेच इतर परिसरात काविळीची साथ पसरली आहे. या परिसरात काविळीचे जवळपास 25 रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... कन्हान नदीच्या पाण्याचा असा बदलला रंग...
बातम्या आणखी आहेत...