आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८५ हजार वाहन चालकांच्या मोबाईल क्रमांकाची झाली नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरही नजर ठेवने पोलिसांना सोयीचे होणार आहे. त्यामुळेच १२ ते २५ मेदरम्यान शहर पोलिस दलातील ६४ पोलिसांनी शहरातील प्रत्येक पेट्रोलपंपावर उभे राहून प्रत्येक वाहनचालकाला मोबाइल क्रमांक घेवून नोंद करण्यास सुरूवात केली होती. या चौदा दिवसात पोलिसांकडे तब्बल ८५ हजार वाहनचालकांच्या मोबाइल क्रमांकाची नोंद झाली आहे. 
 
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर शहरातील प्रत्येक घडामोडीची सचित्र माहिती सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मिळणार आहे. याचदरम्यान एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियमांची पायमल्ली केली आणि पळ काढला तरी त्याची दंडातून किंवा कारवाईतून सुटका होणार नाही. कारण पोलिसांकडे सर्वच वाहनधारकांचे मोबाइल क्रमांक राहणार आहे. जे वाहन रस्त्यांवर धावत आहे. त्या वाहनमालकांचे मोबाइल क्रमांक पोलिसांना या प्रणालीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे पोलिसांनी १२ मेपासून शहरातील सर्व पेट्रोलपंपावर पोलिस तैनात केले होते. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकाकडून पोलिसांनी मोबाइल क्रमांक घेतले आहे. मोबाइल क्रमांक नोंद करण्यासाठी विशेष मोहीम १२ ते २५ मे दरम्यान राबवण्यात आली होती. कारण मोबाइल क्रमांकाशिवाय पोलिसांना सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर चालान किंवा सीसीटीव्ही चालान पाठवता येणार नाही. 

^प्रकल्प कार्यान्वितझाल्यानंतर शहरात सीसीटीव्ही राहतील. यावेळी सुरक्षेसोबत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालकसुद्धा कॅमेरामध्ये दिसतील. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना चालान पाठविण्यासाठी मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही वाहनचालकांचे, मालकांचे मोबाइल क्रंमाक नोंद केले आहे. मागील चौदा दिवसात जवळपास ८५ हजार मोबाइल क्रमांकाची नोंद झाली आहे. कांचनपांडे,सायबर सेल प्रमुख तसेच सचिव सीसीटीव्ही प्रकल्प. 
बातम्या आणखी आहेत...