आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - थकितकर्जवसुलीसाठी बँकेच्या कायदेशीर तगाद्यामुळे तालुक्यातील खिरगव्हाण येथील विजय घोगरे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवार, नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

खिरगव्हाण येथील विजय घोगरे यांच्याकडे पाच एकर बागायत शेत आहे. विजय घोगरे यांनी चिंचोली येथील बँकेतून २००७ मध्ये तीन लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते, तेव्हापासून कर्जाची परतफेड होऊ शकेल, असे समाधानकारक उत्पादन झाल्यामुळे कर्जाची ही रक्कम थकित राहिली. दरम्यान, कर्जवसुलीसाठी बँकेने मार्च २०१५ रोजी नोटीस बजावली होती. त्यापूर्वी बँकेने १९ डिसेंबर २०११ नोव्हेंबर २०१२ मध्ये वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी घोगरे यांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पुरुषोत्तम घोगरे यांनी दिली. तेव्हापासून घोगरे सातत्याने चिंतेत होते. या तणावातच विजय यांनी सोमवार, नोव्हेंबर रोजी घरात विष प्राशन केले, अशी माहितीही पुरुषोत्तम घोगरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. घरच्या मंडळींना घटनेची माहिती होताच त्यांना त्वरित उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी वाजता उपचारादरम्यान, विजय यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय घोगरे यांच्या मागे मोठी मुलगी ईश्वरी (वय ८), लहान वैद्यकी (वय ४), पत्नी, आई भाऊ असा परिवार आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

...तर कारवाई करू
या घटनेसंदर्भात तलाठ्याचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. पीक कर्जाबाबत बँकेने शेतकऱ्यास नोटीस बजावली असल्यास निश्चित कारवाई केली जाईल. प्रदीप पवार, तहसीलदार, अंजनगाव सुर्जी.
बँकेने उचलले कायदेशीर पाऊल
चिंचोली येथील संबंधित बँकेने थकित कर्जवसुलीसाठी थेट शेतकऱ्यांना तगादा लावता कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. थेट तगादा लावता वकिलामार्फत अनेक शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पुरुषोत्तम घोगरे यांनी दिली. या धसक्यानेच भावाने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे लहान भाऊ पुरुषोत्तम घोगरे यांनी केला आहे.