आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दालमीलच्या मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या माधव दालमिल फॅक्टरीमध्ये काम करताना मशीनमध्ये अडकून एका ६२ वर्षीय कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १५) सकाळी घडली आहे. 
 
भारत रघुनाथसिंग चव्हाण (६२, जनता कॉलनी, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. चंद्रशेखर गोविंदजी सारडा (३९, मंगलमुर्ती लेआऊट, अमरावती) यांची माधव दालमिल फॅक्टरी एमआयडीसी परिसरात आहे. या फॅक्टरीमध्ये चार कामगार काम करतात. शनिवारी सकाळी दालमिलमध्ये मशीन सुरू होती. ही मशिन चालवण्याचे काम भारत चव्हाण करत होते. त्यावेळी अचानकपणे ते मशीनच्या पट्ट्यात अडकून, त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले आहे. या प्रकाराने घाबरलेली एक महिला कामगार फॅक्टरी मालकाकडे पोहचली, तिने ही माहिती दिली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...