आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल आग्रेकर हत्‍या प्रकरणातील मुख्‍य आरोपी दुर्गेश बोकडे याची आत्‍महत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकरचे अपहरण व हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या दुर्गेश बोकडेने छत्तीसगड रायपूरमधील गुप्ता गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केली. दुसरा आरोपी पंकज हारोडेला पोलिसांनी २९ नोव्हेंबरला पश्चिम बंगालच्या हावडा येथून अटक केली आहे. ' 


एक कोटीच्या खंडणीसाठी २२ नोव्हेंबरला दुर्गेश व पंकजने राहुलचे अपहरण केले होते. राहुलचे दारोडकर चौकात जैन लाॅटरी सेंटर होते. नागपूरसह िवदर्भातील लाॅटरी सेंटर्सना तो लॉटरीचा पुरवठा करायचा. दुर्गेशचेही येथेच लॉटरीचे दुकान होते. राहुल आणि दुर्गेशमध्ये नेहमी व्यवहार होत असे. याच कारणावरून दोघांत पैशाचा वाद सुरू होता. पंकजवरही लाखोंचे कर्ज होते. त्यामुळे राहुलचे अपहरण करून खंडणी घेत कर्ज फेडण्याचा दोघांचा विचार होता. 

 

पळून जाण्‍यात यशस्‍वी झाला होता दुर्गेश बोकडे  
या प्रकरणातील मुख्‍य आरोपी पंकज हारोडेला बुधवारी पश्चिम बंगालमधील एका लॉजमधून पोलिसांनी अटक केली होती. तेव्‍हा लॉजमधून पळून जाण्‍यात दुर्गेश बोकडे यशस्‍वी झाला होता. तेथून पळून तो छत्‍तीसगडमध्‍ये रायपूर येथे आला होता. तेव्‍हापासून पो‍लिस त्‍याच्‍या मागावर होते. पोलिसांवरही त्‍याला लवकरात लवकर पकडण्‍याबद्दल दबाव होता. त्‍यामुळे पोलिस त्‍याचा कसून शोध घेत होते. याचा ताण सह्य न झाल्‍याने त्‍याने आत्‍महत्‍या केली असावी, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

 

1 कोटीच्‍या खंडणीसाठी केली होती हत्‍या

विदर्भातील सर्वात मोठे लॉटरी व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल (वय 36) याचे 21 नोव्‍हेंबररोजी सकाळी 8.30 वाजता अपहरण करण्‍यात आले होते. 'राहुलचे अपहरण केले असून त्याला सुखरूप सोडायचे असल्यास १ कोटी रुपये लागतील', असे अपहरणकर्त्‍यांनी राहुल यांच्‍या कुटुंबियांना फोन करुन सांगितले होते. मात्र काही निर्णय घेण्यापूर्वीच 22 नोव्‍हेंबररोजी राहुल यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेतत बुटीबोरी परिसरात आढळून आला होता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...