आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा रविवार सोडून आल्या सुट्या, नोकरदारांची मज्जा, एकही सार्वजनिक सुटी रविवारी आली नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रविवार सोडून २०१७ मध्ये सार्वजनिक सुट्या आल्यामुळे चाकरमान्यांची यंदा चागलीच मजा आहे. २०१६ मध्ये बऱ्याच सार्वजनिक सुट्या रविवारी आल्यामुळे चाकरमान्यांना या सुट्यांचा मनसोक्त आनंद उपभोगता आला नव्हता. परंतु, २०१७ मात्र सुट्यांच्या बाबतीत उत्तम वर्ष म्हणता येईल.
या वर्षी एकूण ५३ रविवार आले असून एकही सार्वजनिक सुटी ही रविवारी आली नसल्यामुळे रविवारच्या ५३ सुट्यांसह अन्य सुट्या या वर्षात मिळणार आहेत. अर्थात दोन सार्वजनिक आणि २० शासकीय सुट्या या वर्षी मिळणार असून अनेक सण हे शुक्रवारी किंवा सोमवारी आल्यामुळे बरेचदा दुसरा किंवा चौथा शनिवार रविवार अशा सलग तीन सुट्यांचा आनंद या वर्षांत चाकरमान्यांना उपभोगता येईल.

दोन सार्वजनिक सुट्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन गुरुवारी असून १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी आला आहे. याशिवाय शासकीय सुट्या जसे २४ फेब्रुवारीला शुक्रवारी महाशिवरात्री आहे. त्यानंतर १३ मार्च रोजी धुलीवंदन हे सोमवारी असून होळी ही रविवार १२ मार्च रोजी आहे. २८ मार्च रोजी मंगळवारी गुढीपाडवा असून एप्रिल रोजी मंगळवारीच श्रीराम नवमी आहे. एप्रिल महिन्यात १४ तारखेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुड फ्रायडे शुक्रवारी एकाच दिवशी आल्यामुळे तशी एक सुटी जरी कमी झाली असली तरी इतर सुट्या रविवार सोडून आल्यामुळे याचे फारसे वाईट वाटणार नाही.

मे रोजी महाराष्ट्र दिन सोमवारी, १० मे रोजी बुद्ध पौर्णिमा बुधवारी, २६ जून रोजी रमजान ईद सोमवारी, १५ आॅगस्ट रोजी गोपाळकाला मंगळवारी, १७ आॅगस्ट रोजी पतेती गुरुवारी, २५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थी शुक्रवारी, सप्टेंबरला बकरी ईद शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी दसरा शनिवारी, आॅक्टोबर गांधी जयंती सोमवारी अशा सलग सुट्या आल्या आहेत. यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. नाेव्हेंबर रोजी शनिवारी गुरुनानक जयंती, डिसेंबर रोजी शुक्रवारी ईद मिलाद, २५ डिसेंबर रोजी सोमवारी ख्रिसमस अशी सुट्यांची चंगळ आहे. एकूणच गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुट्ट्याचा चांगला योग जुळून आला आहे.

दिवाळीत सलग चार सुट्यांचा घेता येणार आनंद
यावर्षी दिवाळी आॅक्टोबर महिन्याच्या मध्यात आली असून, १९ आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन (गुरुवार), २० आॅक्टोबरला बलीप्रतिपदा( शुक्रवार), भाऊबीज २१ आॅक्टोबरला (शनिवार) अशा सलग तीन सुट्या आल्या आहेत. यासह रविवारच्या सुटीचाही आनंदही नोकरदार वर्गांना घेता येणार आहे. या सार्वजिनक सुट्ट्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे घोषित होणाऱ्या काही स्थानिक सुट्यांचीही या वर्षीच्या सुट्ट्यांमध्ये भर पडू शकते. यात २१ जुलै रोजी गटारी (लहान पोळा)अमावस्येची सुटी वाढण्याची शक्यता आहे. एकूणच चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...