आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभरा ५,१३५ रुपयांवर, जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील भाव तडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बहुतांश शेतकऱ्यांकडील शेतमाल संपल्यानंतर आता बाजारात तेजी येण्यास सुरूवात झाली असून शनिवारी (दि. ९) दर्यापूर येथील बाजार समितीत हरभऱ्याला सर्वाधिक ५१३५ रुपये दर तुरीला सर्वाधिक ९१०० रुपये भाव धामणगाव रेल्वे बाजार समितीत मिळाला.
दुष्काळी परिस्थितीतीही ऐन हंगामात सोयाबीन, हरभरा, कापूस, तुरीच्या पडलेले भाव आता शेतकऱ्यांकडील बहुतांश शेतमाल संपल्यानंतर सुधारण्यास सुरवात झाली आहे. या दरवाढीचा फायदा मोजक्या शेतकऱ्यांसह खरेदीदारांना होत असल्याचे चित्र सध्या बाजारात निर्माण झाले आहे. यावर्षी अल्प पावसामुळे प्रथमच खरीप आणि रब्बी पिकांमध्ये कमालीची घट झाली आहे. समाधानकारक उत्पादन झाल्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांनी गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतमाल विकला. सोयाबीनला ऐन हंगामात सरासरी ३२०० ते ३५००, तुरीला सुरवातीला ८००० ते ९४००, हरभऱ्याला सरासरी ४००० ते ४२०० तर कापसाला सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर तुरीची आवक वाढल्याने बाजारात तुरीचे दर सरासरी आठ हजार ते साडे आठ हजार रुपयांवर स्थिर होते. दरम्यान, चालू आठवड्यात बहुतांश शेतमालाच्या दरात सुधारणा झाली असून जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये भावात सुधारणा झाली आहे. शनिवारी दर्यापूर येथील बाजार समितीत हरभऱ्याला जिल्ह्यात सर्वाधिक कमाल ५१३५ तर किमान ३५६० रुपये, तुर कमाल ९०१५ तर किमान ८५४५, सोयाबीन कमाल ३९०० तर किमान ३३२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. धामणगाव रेल्वे बाजार समितीत तुरीला सर्वाधिक कमाल ९१०० तर किमान ८५००, हरभरा कमाल ५०२५ तर किमान ४२००, सोयाबीनला कमाल ३९०० तर किमान ३६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अमरावती बाजार समितीत हरभऱ्याला कमाल ५०५० तर किमान ४९००, सोयाबीन कमाल ३९०० तर किमान ३८००, तुर कमाल ९०५० तर किमान ८५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

बाजारपेठेत शेतमालाची आवक मंदावली : जिल्ह्यातीलप्रमुख बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक कमालीची मंदावली आहे. अमरावती बाजार समितीत ऐन हंगामात होणारी सरासरी ४्० हजार पोत्यांची आवक सध्या सरासरी सहा हजार पोत्यांवर आली आहे.

अमरावतीतगहू तेजीत : अमरावतीबाजार समितीत गव्हाला कमाल १९०० तर किमान १६५० रुपये, धामणगाव रेल्वे येथे कमाल १६२५ तर किमान १५००, अंजनगाव सुर्जी येथे कमाल १८०० तर किमान १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.त्यामुळे शेतमालाची आवक वाढत आहे.

दोन महिन्यांनंतर पांढऱ्या सोन्याच्या भावात तेजी
तब्बल दोन महिन्यानंतर कापसाच्या भावात तेजी आली असून, धामणगाव रेल्वे येथील खासगी बाजारात शनिवारी कापसाला कमाल ५०८५ रुपये , अमरावती बाजार समितीमध्ये ४८५०, दर्यापूर ४८००, अंजनगाव सुर्जी येथे ४९०० रुपये कमाल भाव मिळाला.