आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, ठिकठिकाणी कृत्रिम टाक्यांची केली निर्मिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गेल्या काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार करण्यात आलेल्या गणेश मुर्ती बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. मात्र या मूर्ती पाण्यात लवकरच विसर्जित होत नाहीत, तसेच पर्यावरणाचा ऱ्हासही होतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात परंपरा जोपासत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन दिव्य मराठीच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत यवतमाळ शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत घरात स्थापन केलेल्या गणेश मूर्तींचे घरातच विसर्जन केले. यवतमाळमध्ये सप्टेंबरपासून गणेश विसर्जनाला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली असून सप्टेंबरपर्यंत विसर्जन होणार आहे. 
 
घरोघरी विराजमान असलेले गणराज परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. गणेश मूर्ती परंपरेनुसार शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीबाबत दैनिक दिव्य मराठीने जागृती केली. त्यामुळे अशा मूर्ती विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली. गणेशोत्सवानंतर या मूर्तीचे विसर्जन शहरातील विविध भागात असलेल्या विहिरी, नद्या, नाले, तलाव या ठिकाणी करण्यात येते. यंदाच्या गणेशोत्सवात आपण गणरायाच्या मूर्तीचे घरातच विसर्जन करु किंवा पर्यावरण पुरक असे विसर्जन करु असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद देत शहरात विविध भागात तयार करण्यात आलेल्या कृत्रीम टाक्यांमध्ये गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी यवतमाळकरांनी पुढाकार घेतला अाहे. विशेष म्हणजे, समर्थ ब्राम्हण मंडळाच्या वतीने मूर्ती विसर्जनासाठी विविध परिसरांमध्ये विसर्जनाचे कृत्रीम टाके तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात सावरकर मैदान, बाजोरीया नगर, पुष्पकुंज सोसायटी, समर्थवाडी यांच्यासह इतर परिसराचा समावेश होता. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या कृत्रीम टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. 
 
निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था : गणेश मूर्तींसोबत १० दिवसांमध्ये गोळा झालेले निर्माल्यही विसर्जनाच्या वेळी विहिरी किंवा तलावात टाकण्यात येते. मात्र यंदा कृत्रिम टाके तयार करतेवेळी सामाजिक संस्थांनी त्याच ठिकाणी निर्माल्यासाठी एक वेगळा खड्डा तयार केला. यायात निर्माल्य गोळा करण्यात आले. नंतर माती टाकून तो बुजवण्यात येईल. 
बातम्या आणखी आहेत...