आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० कोटींच्या ‘राणा लॅन्डमार्क’ची ‘ईडी’कडून होणार झाडाझडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कमी दर सुलभ हप्त्यांमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून शेकडो ग्राहकांची १० कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क प्रकरणाची प्रवर्तन निर्देशालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. एखाद्या गुन्ह्यात ‘ईडी’मार्फत शहरात प्रथमच चौकशी होणार आहे, हे येथे उल्लेखनीय.

राणा लॅन्डमार्कच्या वतीने कमी दर सुलभ हप्त्यांमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून शहरात ६५५ ग्राहकांची सुमारे १० कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात २५ सप्टेंबर २०१४ ला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संचालक योगेश राणा तसेच शशिकांत जिचकार, अभय शिरभाते यांना अटक केली आहे. पोलिसांकडे आतापर्यंत तब्बल ६५५ तक्रारदारांनी राणा लॅन्डमार्ककडून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करताना राणा लॅन्डमार्कची विविध ठिकाणी असलेली स्थावर जंगम मालमत्ता उघड केली आहे. यामध्ये शेत, भूखंड अशा मालमत्तांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत जवळपास १० कोटी रुपयांची मालमत्ता उघड केली आहे. दरम्यान, तपास सुरू असताना ‘ईडी’मार्फत तपास करण्यात यावा यासाठी शहर पोलिसांकडून पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘ईडी’मार्फत लवकरच राणा लॅन्डमार्कचा संचालक योगेश राणाची चौकशी करण्यात येणार असून, त्याबाबतचे पत्र लवकरच पोलिसांना मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ‘ईडी’ स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याने तक्रारकर्त्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

तक्रार कर्त्यांसाठी ६५५ जणांनी केली पोलिसांत तक्रार दाखल
आर्थिक घोटाळ्यातील ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्री अॅक्ट २००२’ मधील तरतुदीनुसार ‘ईडी’मार्फत चौकशी केली जाते. ‘एनफोर्समेंट डायरेक्टरेट’ (ईडी) म्हणजेच प्रवर्तन निर्देशालय (अंमलबजावणी संचालनालय) ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आर्थिक प्रकरणाची चौकशी करणारी यंत्रणा आहे. सध्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या आर्थिक घोटाळ्याची ईडीने चौकशी केल्यानंतर भुजबळ यांना गजाआड व्हावे लागले. अमरावती शहरात राणा लाॅडमार्कप्रकरणी आतापर्यंत ६५५ जणांनी तक्रार दाखल केली आहे.
बातम्या आणखी आहेत...