आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंकडून सुनावणी लांबवण्याचे प्रयत्न, एमआयडीसीचा आरोप; अर्जावर अाज निर्णय शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाेसरी भूखंड घाेटाळ्याची चाैकशी करत असलेल्या न्या. झाेटिंग आयोगापुढील मुद्दे नव्याने फ्रेम करण्यात यावे, तर काही मुद्दे वगळण्यात यावे,  या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मागणीवरील सुनावणी गुरुवारी अपूर्ण राहिली. त्यामुळे  शुक्रवारी याबाबत निर्णय हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, कामकाज अंतिम टप्प्यात असताना खडसे यांच्याकडून दाखल होत असलेले अर्ज हा आयोगाची सुनावणी लांबविण्याचा प्रकार असल्याचा आरोप एमआयडीसीच्या वकिलांनी केला. 

आयोगापुढील मुद्दे नव्याने फ्रेम करण्यात यावे, तर काही मुद्दे वगळण्यात यावे, या खडसे यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी अपूर्ण राहिली. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी वेळोवेळी दिलेले दाखले उद्या सादर करण्याची विनंती खडसे यांच्या वकिलांकडून करण्यात आल्याने आयोगाने गुरुवारी  निर्णय राखून ठेवला. आता त्यावर शुक्रवारीच निर्णय लागण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, खडसे यांच्याकडून होत असलेले नवे अर्ज हा सुनावणी लांबविण्याचा प्रकार असल्याचा आरोप एमआयडीसीचे वकील अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी केला. आयोगाने त्यांना आतापर्यंत पूर्ण संधी दिलेली आहे, असा दावाही त्यांनी केला. खडसे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि एमआयडीसीचे तत्कालीन सीईओ भूषण गगराणी या अधिकाऱ्यांना आयोगापुढे पुन्हा बोलावण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. मात्र, त्यावर ते फारसे गंभीर नसल्याचे मत अॅड. जलतारे यांनी व्यक्त केले.

काय अाहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील भाेसरी येथील एमअायडीसीचा भूखंड मंत्रिपदाचा गैरवापर करुन अल्पदरात लाटल्याचा माजी मंत्री एकनाथ खडसेंवर अाराेप अाहे. याच कारणावरुन वादात अडकल्यामुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी राज्य सरकारने न्या. झाेटिंग या एकसदस्यीय अायाेगाची नेमणूक केली असून त्यांच्यासमाेर नागपुरात खडसेंची चाैकशी सुरू अाहे.
बातम्या आणखी आहेत...