आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या समृद्धीतील सर्व अडथळे दूर करू, एकनाथ शिंदे यांची पत्रपरिषदेत ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- शेतकऱ्यांना जमिनीचा पाच पट दर देण्यात येत आहे. संवाद संमतीनेच जमिनी घेत आहेत, शेतकऱ्यांच्या समृद्धीतील सर्व अडथळे दूर करू, अशी ग्वाही बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. हिंगणा येथे समृद्धी महामार्गाचे राज्यातील पहिले िवक्रीपत्र गुरुवारी केले. त्यानंतर नागपूर येथे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. येत्या आॅक्टोबरला भूमीपूजन होईल, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेना पक्षप्रमुखांचा वा शिवसेनेचा समृद्धी महामार्गाला विरोध नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नितीन गडकरींनी बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच पूर्ण केला, असे शिंदे म्हणाले. महामार्गाचा एकूण खर्च ४६ हजार कोटी इतका आहे. हुडको, म्हाडा, एमएमआरडीए, सिडको यांच्याकडून हजार कोटींचे कर्ज घेतले. या प्रकल्पाची सिव्हील काॅस्ट २४ हजार कोटी आहे. २४०० कोटी नवनगर निर्मितीवर तर ६०० कोटी सेवा प्रकल्पांवर खर्च होणार आहे. वाटाघाटी आणि लॅण्ड पुलिंग असे दोन्ही पर्याय शेतकऱ्यांसाठी खुले ठेवल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, उपस्थित होते. 

समृद्धी दृष्टीक्षेपात 
- येत्या आॅक्टोबरला भूमीपूजन 
- ७०० किमी लांब 
- आठ पदरी महामार्ग 
- वाहनांचा वेग ताशी १५० किमी 
- ५ ठिकाणी िवमान उतरण्याची व्यवस्था 
- टोलनाका एंट्री एण्डींगला 
- २४ कृषी समृद्धी केंद्र 
- रेडीरेकनरच्या पाचपट रक्कम 
- ३९२ पैकी ३७१ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण 
- एकूण ६७२.५४ किमी मोजणी पूर्ण 
बातम्या आणखी आहेत...