आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक, तिकीट नाकारून काँग्रेसचा नारायण राणेंना दणका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना िवधान परिषदेसाठी ितकीट नाकारून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुन्हा मोठा दणका िदला आहे. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राणेंऐवजी पक्षातर्फे भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्येक निवडणुकीआधी राणे इच्छुक अशी जाहिरात करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर खुद्द राणेंनीच टीका केली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले हाेते. दरम्यान, शिवसेनेने या मतदारसंघातून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना उमेदवारी दिल्याने अाता कदम व जगताप यांच्यात सामना रंगणार आहे.
कुडाळ विधानसभा निवडणूक व वांद्रे पोटनिवडणूक असा सहा महिन्यांत दाेनदा पराभवास सामाेरे जावे लागल्याने राणे नाराज अाहेत. त्यातून ते अापल्याच पक्षावर व पक्षनेत्यांवर टीका करू लागले अाहेत. काँग्रेसमध्ये गटबाजी असून पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे राणेंनी म्हटले होते. शिवाय पक्षात गटबाजी असून आमचेच नेते माध्यमांत बातम्या पुरवत असल्याचा आरोपही राणेंनी केला. निवडणुका आल्या की नाव सुचवणारे आणि विरोध करणारे नेते काँग्रेसचेच नेते असल्याचा टोलाही राणे यांनी लगावला हाेता.

‘अाता कुठलेही आव्हान पेलण्याची माझी ताकद असून मी आमदार असलो काय आणि नसलो काय, आपला रुबाब असाच राहणार’, असे म्हणत राणेंनी टीकास्त्रही सोडले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, राणे यांना चव्हाण, विखेंचा होता विरोध... विधान परिषद निवडणूक :
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी