आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्यापासून होणार नागपुरात वीजनिर्मिती; महापालिकेचा दोन खासगी कंपन्यांशी करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा राज्यतील पहिला प्रकल्प उपराजधानी नागपुरात उभा होणार आहे. सुमारे ३३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प ३० महिन्यात पुर्ण होणार असून नागपूर महानगर पालिकेच्या यासाठी काल दोन कंपन्यांशी करार पार पाडलेत. 
 
नागपूर महापालिकेने या प्रकल्पासाठी एस्सेल इन्फ्राप्रोजेक्ट आणि हिताची झोसेन इंडिया या दोन कंपनीशी करार केला. या कंपन्या ११.५० मेगावॉट विजेची निर्मिती करणार आहेत. नागपुरात रोज एक हजार मेट्रिक टन घनकचरा तयार होतो. यापैकी केवळ २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत आणि इंधन तयार केले जाते. उर्वरित ८०० मेट्रिक टन कचऱ्याच्या वापर वीजनिर्मितीसाठी होणार आहे. शहरात गोळा होणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर यामुळे प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी एस्सेल आणि हिताची या कंपन्या २१८कोटींची गुंतवणूक करणार आहेत. तर महापालिका ७० कोटी खर्च करणार आहे. प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी कंपन्यांकडेच राहणार आहे. या कंपन्या वीज विकून खर्च काढणार आहेत. नागपूर महापालिकेने २०१४ पासून या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरु केले होते. हा प्रकल्प ३० महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार आहे. या प्रकल्पामुळे नागपुरातील घनकचऱ्याची समस्या सोडविण्यात बऱ्याच अंशी मदत होणार आहे. प्रकल्पासाठी पूर्व नागपुरातील भांडेवाडी परिसराची निवड करण्यात आली आहे. सध्या याच भागात शहरातील सर्व कचरा साठविला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याने या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यात आग लागण्याची समस्या दरवर्षीच भेडसावत असते. 
बातम्या आणखी आहेत...