आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच खांब कुजले, ताणही तुटले, केव्हाही कोसळण्याची भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पथ्रोट - येथील वाॅर्ड क्रमांक एक, तीन, चार, पाच सहामधील पाच विजेचे खांब खालून पूर्णपणे गंजून तुटण्याच्या अवस्थेत आहेत. खांबांना दिलेले ताणही तुटल्याने हे खांब केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून महावितरण कंपनीकडे ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत असून, महावितरणचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पथ्रोट येथील पाच वाॅर्डातील भरवस्तीतून गेलेल्या वीज वाहिन्यांचे लोखंडी खांब गंजलेले आहेत. यातील पाच थांब मात्र मरणावस्थेत असून केव्हाही कोसळू शकतात, अशा भीषण अवस्थेत आहेत. पाच खांब खालून पूर्णपणे गंजले असून, त्यांना छिद्रे पडली आहेत. बहुतेक खांब रहदारीच्या मार्गावर असल्याने एखाद्या वाहनाचा साधा धक्का जरी त्यांना लागला, तर विजेचा धक्का खांब कोसळण्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वाॅर्डातील नागरिकांनी अनेकवेळा या संभावित दुर्घटनेबाबत वीज कंपनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवले. परंतु, अद्यापही वीज कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाॅर्ड क्रमांक एकमधील वासुदेव गावंडे यांच्या घरासमोरील विजेचा खांब खालून पूर्णपणे कुजला आहे. विशेष म्हणजे या खांबाला ताणही नाही. हा खांब एखाद्या वाहनाच्या धडकेने किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावंडे यांच्या घरावर किंवा रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाॅर्ड क्रमांक सहामधील सुधाकर हावरे, वाॅर्ड क्रमांक चारमधील मनोहर गोरले, किशोर हागे, वाॅर्ड क्रमांक तीनमधील काशिनाथ धामळे यांच्या घराजवळील खांब जीर्णावस्थेत झाले आहेत. गुजरी लाइनमधील पोल नाल्यातच उभा असून, त्यावर वेली चढल्या आहेत. खांबाशेजारीच पिंपळाचे झाड वाढले आहे. खांब बदलवण्याचे काम वीज कंपनीच्या प्रशासनाने त्वरित करण्याची गरज असून, दुर्घटना झाल्यास याला कंपनीचे अधिकारी जबाबदार राहणार असल्याचे मत किशोर हागे, रूपराव नळकांडे, प्रभाकर गौड, सुधाकर नळकांडे, साहेबराव काकड आदींनी सांगितले.

आणलेलाखांब लावण्याचेही सौजन्य नाही : यावाॅर्डातील कुजलेला खांब बदलवण्यासाठी नंदकिशोर गावंडे सुनील बाभुळकर मागील पाच वर्षांपासून वीज कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बेदखल केले आहे. वीज कंपनीचा कळस म्हणजे, संबंधित नागरिकांनी स्वखर्चाने नवीन खांब आणला आहे. परंतु, ठेकेदार नाही, कामगार नाही, अशी कारणे सांगून खांब लावण्याचे सौजन्यही कंपनी दाखवत नसल्यामुळे संताप व्यक्त हाेत आहे.त्यामुळे वरील वाॅर्डातील नागरिकांच्या जिवाला धोका आहे.

खांबाला वेल्डिंग करून देऊ
^मीरुजूहोऊन काहीच दिवस झाले आहेत. मी संबंधित खांबांची अवस्था पाहिली असून, सध्या आमच्याकडे साहित्य नसल्यामुळे आम्ही त्याच खांबाला वेल्डिंग करून देऊ. नवीन पोल आल्यानंतर त्वरित बदलवून देऊ. शरद इळपाते, सहायकअभियंता, वीज वितरण कंपनी, पथ्रोट.

जीव गेल्यावरच जाग येणार का?
^माझ्या घराशेजारील खांब केव्हाही कोसळू शकतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. परंतु, समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. महावितरण कंपनीला जीव गेल्यावरच जाग येईल का? समीर हावरे, नागरिक.

जीर्ण खांब त्वरित बदलावे
^संभाव्यघटनेचेगांभीर्य ओळखून महावितरण कंपनीने जीर्ण खांब त्वरित बदलवणे आवश्यक आहे. परंतु, कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. मनोहर गोरले, नागरिक.

स्वखर्चाने आणला खांब
^मी याखाबांबाबत सातत्याने २०१० पासून पाठपुरावा करीत आहे. अनेक अर्ज, विनंत्या झाल्या. स्वखर्चाने पोल आणला. परंतु, कंपनीकडून तोही लावण्यासाठी मुहूर्त निघाला नाही. सुनील बाभुळकर, नागरिक.

शुक्रवारीच दिले निवेदन
^जीर्ण झालेल्या वीज खांबांमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारीच निवेदन दिले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने बघू या, असे म्हटले. गोपाळराव कावरे, सरपंच.