आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये 109 ठिकाणी वीजचोरी, महावितरणची एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वीजेच्या अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून वीज चोरांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत वीजचोरी पकडण्याची मोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी १० ऑगस्टला अमरावती जिल्ह्यात एकाच वेळी महावितरणने विविध ठिकाणी धाड टाकल्या. यावेळी अमरावती जिल्हयातील ८१ ग्राहक थेट वीजचोरी २८ ग्राहक अनियमित विजेचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध विद्युत कायद्यानुसार कारवाई होणार आहे. अशी माहिती महावितरणने दिली आहे.

ग्राहकाने वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिट विजेचे बिल वसूल व्हावे, अनधिकृत विजेच्या वापराला आळा बसावा , नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, याशिवाय वीज चाेरांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यात गुरूवारी मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली आकस्मिक मोहिम राबविण्यात आली. लाईन स्टाफ, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता ते मुख्य अभियंता असे एकूण जिल्ह्यातील ३६२ कर्मचारी, अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. 
 
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महावितरणने ही धडक मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम सर्वत्र राबवण्यात येत आहे. तडजोड स्विकारता वीज चोरांविरुद्ध विद्युत कायदा १३५ नुसार थेट गुन्हे दाखल करण्याचे प्रादेशीक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी निर्देश दिल्याने वीजचोरांना आवर घालण्यासाठी महावितरण अमरावती परिमंडळांत यानंतर अशा प्रकारच्या आकस्मिक मोहीम सतत राबवल्या जाणार आहेत. 
 
विजेचा दुसऱ्या कारणांसाठी वापर 
या मोहिमेत जिल्ह्यात एकूण ४७ ग्राहक थेट वीज चोरी करत असल्याचे आढळून आले. यामध्ये अमरावती शहरातील ५, ग्रामीण विभागातील १३, अचलपूर विभागातील २३ तर मोर्शी विभागातील ग्राहकांचा समावेश आहे. तर आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या एकूण ३४ ग्राहकांपैकी १० ग्राहक अमरावती शहरातील, १७ ग्रामीण विभागातील, तर मोर्शी विभागातील ग्राहकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वीज घेतली, त्या कारणांसाठी वापरता त्या विजेचा दुसऱ्या कारणांसाठी वापर करणारे जिल्ह्यात एकूण २८ ग्राहक आढळून आले. 
 
बातम्या आणखी आहेत...