आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बच्या कॉलमुळे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भुवनेश्वरहून मुंबईकडे निघालेल्या गो एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानाचे नागपूर विमानतळावर शनिवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सखोल तपासणीअंती कुठलीही आक्षेपार्ह वस्तू आढळून न आल्याने दुपारच्या सुमारास विमान मुंबईकडे रवाना करण्यात आले.
शनिवारी सकाळी ८.२० वाजता भुवनेश्वरहून गो एअरचे विमान मुंबईच्या दिशेने झेपावले. मात्र, काही वेळातच बिजू पटनायक विमानतळाच्या व्यवस्थापकाला अज्ञात व्यक्तीने फोन करून विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे पायलटला नागपुरात विमान उतरवण्याची सूचना देण्यात आली. साडेनऊच्या सुमारास विमानाचे लँडिंग झाले. या वेळी विमानात दीडशे प्रवासी होते.