आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या कॉटन मार्केटची तोडफोड, मारहाणीत दोन सुरक्षारक्षक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील जुन्या कॉटन मार्केटसमोरील हॉकर्सचे अतिक्रमण हटविताना संतप्त झालेले ४० ते ४० किरकोळ विक्रेते महानगर पालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, अतिक्रमणाबाबतची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिल्याच्या संशयावरून काही विक्रेत्यांनी जुना कॉटन मार्केट मध्ये घुसून कार्यालयात तोडफोड करून बिलबुक, पावतीबुक फाडले. दरम्यान विक्रेत्यांना दोन सुरक्षा रक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनाही मारहाण करण्यात आली. ही घटना गुरूवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.
शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापािलका पोलिसांकडून संयुक्तपणे मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक इर्विन चौक ते दिपक चौक मार्गावरील हॉकर्सना हटविण्याचे काम करत होते. या वेळी काही हॉकर्सच्या हातगाड्या उचलण्यात आल्या. याचवेळी कारवाईमुळे संतप्त झालेल्या हॉकर्सनी अचानकपणे या कारवाईला विरोध करून मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांजवळ येऊन त्यांना अश्लील शिवीगाळ केली. चाकूने मारण्याच्या धमक्या दिल्या. हा वाद सुरूच असताना काही हॉकर्स इतर ४० ते ५० जणांचा जमाव जुन्या कॉटन मार्केटमध्ये घुसला. यावेळी मार्केटच्या प्रवेशव्दारावर असलेले सुरक्षारक्षक दीपक नागोरावजी चौधरी (वय ४४) आणि दिनेश देवरावजी वर्धे (वय ४५) यांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने या दोघांना मारहाण केली. या वेळी मुख्य प्रवेशव्दार सोडून जमाव आतमध्ये पोहचला. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशदारावर असलेल्या कार्यालयात घुसून संतप्त विक्रेत्यांनी कार्यालयातील सेस, बिलबुक फेकले तोडफोड केली. कार्यालयात असलेली वसुलीची रक्कमही फेकण्यात आली. खुर्च्या तोडून खिडक्या, दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या. तोडफोड सुरू झाल्यानंतर कर्मचारी अधिकाऱ्यांनाही नेमके काय झाले याची कल्पना आली नाही. दरम्यान अतिक्रमन पथकासोबत असलेल्या पोलिसांच्या पथकाला ही माहिती मिळताच पोलिस बाजार समितीच्या आवारात गेले. त्यानतंर अवघ्या काही क्षणात जमाव निघून गेला. मात्र तत्पुर्वी जमावाने ज्या पध्दतीने धुडघुस घातला. झालेल्या घटनेने बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी चांगलेच धास्तावले आहे. या प्रकरणी फळ भाजीपाला मार्केटचे विभागप्रमुख राजेश इंगोले यांनी कोतवाली पोिलस ठाण्यात याबाबत तक्रार दिली . त्यांनी तक्रारीमध्ये सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे सांगितले तसेच तोडफोडमध्ये बाजार समितीचे किमान ते हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनीही तक्रार दिली असून ४० ते ४५ जणांचा जमाव आमच्यावर चालून आला. यावेळी कलीम खान अजीज खान (४०, रा. रोशननगर) आणि फिरोज खान हफिज खान (२६, हबीबनगर) या दोघांनी शिवीगाळ करून चाकुने मारण्याची धमकी दिल्याचेही कुत्तरमारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोघांसह अन्य ४० ते ४५ जणांविरुध्द शासकिय कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती येथील जुना कॉटन मार्केटसमोरील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवताना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलिस. दुसऱ्या छायाचित्रात बाजार समितीमध्ये जमलेला जमाव.
विक्रेत्यांनी केलेली तोडफोड.

हल्ला का केला, समजलेच नाही
^आम्ही आमचे सहकारी कर्मचारी कार्यालयात काम करत होते. अचानकपणे ४० ते ४५ जणांचा जमाव कार्यालयावर आला. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या सुरक्षारक्षकांना मारहाण केली त्यानंतर कार्यालयात येऊन खुर्च्या, दरवाजाची तोडफोड केली. बिलबुक फेकले, पावत्या, पैसे फेकले हा हल्ला का कशासाठी केला ते आम्हाला समजलेच नाही. या प्रकरणी आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे.’’ राजेशइंगोले, प्रमुख, फळ भाजीपाला, बाजार समिती.

कारवाईची भिती की हेतुपुरस्सरपणे हल्ला?
अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू झाली होती. पथकाने हातगाडी उचलून नेली तर आपली ‘रोजीरोटी’ थांबून जाईल या भितीने हा जमाव बाजार समितीमध्ये बचावासाठी गेला होता. की बाजार समितीने आपल्यावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण पथकाला सांगितले असावा असा गैरसमज करून हल्ला हेतुपुरस्सपणे केला असावा, अशी चर्चा या प्रकारानंतर बाजार समिती परिसरात सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...