आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींनाही मिळणार आता ओपन जिम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती महानगर पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात खुले जिम उघडून नागरिकांना मोकळ्या ताज्या हवेत व्यायाम करण्याची संधी दिली आहे. याच्याच पुढील एक भाग म्हणून जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नागरिकांना व्यायामासाठी ग्रामपंचायतीच्या जागेवर खुले (ओपन) जिम साहित्य बसवून मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहे.
 
या खुल्या जिममध्ये साधारणत: आठ ते दहा यंत्रे बसवली जातात. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने व्यायाम होतो. तसेच आपण नवीन काहीतरी करीत आहोत, या भावनेतून लोक एकत्रित येत असतात. यात अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच समावेश राहणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती येथे खुल्या जिमसाठी अर्ज उपलब्ध आहेत. प्रस्तावामध्ये अर्जासोबत ग्रामपंचायत मालकीच्या कम्पाउंड असलेल्या खुल्या जागेची कागदपत्रे, जागेचा चर्तुसीमा नकाशा, पटवार, तलाठी, सरपंच ग्रामसचिव यांचे पासपोर्ट फोटो, २०१६-१७ या वर्षातील ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाची यादी, आधार कार्डच्या झेराॅक्स प्रती (सरपंच ग्रामसचिव), व्यायाम साहित्याची यादी, १०० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प, प्रतिज्ञापत्राचा नमुना अर्जासोबत जोडण्यात आला आहे. ग्रामपंचायत मालकीची कम्पाउंड असलेली खुल्या जागेचे फोटो या ते कागदपत्रांसह प्रस्ताव डीएसओ कार्यालय विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती येथे २६ मे पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.
 
ग्रामस्थांमध्ये खेळाची आवड निर्माण होईल
गावातील लोकांनाही व्यायामाची आवड लागावी, नियमितपणे सोपा परंतु, यंत्रांच्या मदतीने व्यायाम करून दिवसभरासाठी शरीराला तजेला द्यावा, या उद्देशाने ग्रामपंचायतींना खुल्या जिमचे साहित्य पुरविले जाणार आहे. गाव तेथे स्वास्थ्य संकल्पना राबवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
 
बातम्या आणखी आहेत...