आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी ६३ बसेस जाणार, जिल्ह्यातील आठ आगारांमधून १५८ चालक, वाहक देणार सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सिंहस्थकुंभमेळ्यासाठी एसटी महामंडळाच्या अमरावती विभागातून ६३ बसेस नाशिक येथे जाणार असून, २२ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीत महिनाभर ही वाहने त्याठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्रासाठी अमरावती विभाग या वाहनांसोबतच ५९ चालक आणि ७९ वाहकांची सेवादेखील पुरवणार आहे. मुक्कामी राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देण्यात आले असून, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टप्प्याटप्प्यात ही वाहने नाशिक येथे पोहोचणार आहेत.कुंभमेळा कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेता ‘इश्यु अँड स्टार्ट पद्धती’चा अवलंब केला जाणार आहे. याशिवाय नाशिकला जाणाऱ्या बसेसला मार्गामध्ये इंधन मिळणार नसल्याचे टॉप अप करून वाहन पाठवावे लागणार आहे. या बसेसला मार्ग फलकदेखील लावण्यात येणार आहे.

आगार वाहने चालक वाहक
अमरावती०८ १० १०
बडनेरा ०८ १० १०
परतवाडा ०७ ०९ ०९
वरुड ०८ १० १०
चांदूररेल्वे ०८ १० १०
दर्यापूर ०८ १० १०
मोर्शी ०८ १० १०
चांदूरबाजार ०८ १० १०
विभाग ६३ ७९ ७९
त्र्यंबकेश्वर क्षेत्र
नाशिक क्षेत्र
२९ ऑगस्ट पहिली पर्वणी
१३ सप्टेंबर दुसरी पर्वणी
२५ सप्टेंबर तिसरी पर्वणी
२९ ऑगस्टपहिली पर्वणी
१३सप्टेंबरदुसरी पर्वणी
१८सप्टेंबरतिसरी पर्वणी

जिल्ह्यात मात्र भंगार बससेवा
जिल्ह्यात आधीच गाड्यांचा तुटवडा त्यामध्ये नवीन गाड्या कुंभमेळ्यासाठी पाठवण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना झटके खातच प्रवास करावा लागणार आहे. नाशिक येथे पाठवण्यात येणाऱ्या बसेस योग्य प्रकारे देखभाल करून पाठवावी लागणार आहे. पर्वणी कालावधीत बसेस मार्गस्थ बिघाड होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे.