आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faremer Try To Burn Him Self Cause Of Indebtedness In Amravati

कर्जबाजारी शेतकऱ्याने जाळून घेतले, अमरावती जिल्ह्यातील घटना, मृत्यूशी झुंज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सततची नापिकी, त्यातच डाेक्यावर वाढत असलेला कर्जाचा डाेंगर यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या अमरावती जिल्ह्यातील लाखनवाडी येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी पेटवून घेतले. यात रामेश्वर रमेशराव जवंजाळ हे ९६ टक्के भाजल्याने मृत्यूशी झुंज देत अाहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

रामेश्वर यांच्याकडे लाखनवाडी शिवारात २ एकर शेत आहे. यावर्षी त्यांनी सोयाबीन व तूर पेरली होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन झाले नाही. जवंजाळ यांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी एका बँकेकडून ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र नापिकीमुळे त्यांना कर्ज फेडता येत नव्हते. यावर्षी त्यांनी पुन्हा गावातून काही लाेकांकडून उसनवारी पैसे घेतले हाेते. कर्जाची रक्कम वाढतच होती. यामुळे ते चिंतेत हाेते. बुधवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून रामेश्वर यांनी अंगावर रॉकेल अाेतून पेटवून घेतले. घरातून धूर येत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी तातडीने रामेश्वर यांच्या अंगाला लागलेली अाग विझवून त्यांना रुग्णालयात दाखल केले.

रामेश्वर यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची मुलगी श्रावणी व चार वर्षांचा मुलगा सोहम असा परिवार अाहे.