आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष घेऊन शेतकरी पोहोचला पोलिस ठाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंजनगावसुर्जी तालुक्यातील धुळकी येथील रहिवासी एका ५० वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवार, १८ मार्च रोजी अंजनगाव सुर्जी येथे विष प्राशन केले. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सुरेश वासुदेवराव आठवले (५०, रा. धुळकी), असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश आठवले यांनी शुक्रवारी दुपारी विष घेतले त्याच अवस्थेत ते ठाण्यात पोहोचले. मी विष घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...