आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बाभुळगाव येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभुळगाव- तालुक्यातील कांदेगाव येथील शेतकरी अशोक विश्वनाथ माईंदे वय ५५ हे मौजा हातगाव शिवारातील आपल्या शेतात काम करत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतक हा हातगाव शिवारातील शेत सर्व्हे क्र. ७९ या शेतात सकाळपासून काडीकचरा वेचण्याचे काम करत होता.
सायकांळी ५.३० च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अशातच अशोक माईंदे यांच्या शेतात वीज पडल्याने त्यांच्या उजव्या भागाला जबरदस्त धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान लगतच्या शेतकऱ्यांना त्यांचा मृतदेह शेताच्या मधोमध आढळून आला. याबाबतची माहिती मुबारकपूरचे पोलिस पाटील बाबाराव ढोणे यांनी पोलिस स्टेशनला कळविली. पोलिसांनी घटनास्थळ मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. अशोक माईंदे यांची बाभुळगाव तालुक्यात तीन एकर शेती आहे. याच शेतात ते काम करत होते. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या मृत्यूमुळे कुटूंब उघड्यावर आले.
बातम्या आणखी आहेत...