आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवणगाव परिसरामध्ये वीज पडून शेतकरी ठार; जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातदुपारच्या सुमारास शहरासह सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली असून यामुळे तब्बल महिनाभर उशीर झालेल्या पेरण्यांना गती येणार आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसामुळे तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला. शिवणगाव (ता. तिवसा) येथे शेतातून पेरणी करून परत येताना वीज कोसळल्याने अंबादास जयरामजी येवतकर ( ६७) यांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. फत्तेपूर येथे वीज कोसळल्याने पेरणी करताना बैल ठार दगावला. तर मोझरी येथे आडनदीला आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेले.
तिवसा, धामणगाव येथे झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. धामणगाव तालुक्यात आठ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. धामणगाव रेल्वे येथे विदर्भ नदीला पूर आला. त्यामुळे अंजनसिंगी-कौंडिण्यपूर मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद होता. जिल्ह्यात दुपारच्या सुमारास सर्वच तालुक्यात सुमारे तास-दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. शिवणगाव येथील अंबादास येवतकर दुपारी जिल्ह्यात ‘डीजिटल व्हिलेज’चा शंखनांद सध्या सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञान खेड्यापाड्यापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जिल्ह्यापासून अवघ्या २७ कि.मी.अंतरावर असलेल्या शिवणगाव येथे तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होऊन पाच जण जखमी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात रात्री सव्वासात पर्यंत पोहचू शकली नाही. कक्षात रात्रपाळीवर असलेल्या प्रवीण बोंदरकर यांनी आमच्या हाती कोणत्याही घटनेची माहिती आली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे सुरेंद्र रामेकर यांनीही नियंत्रण कक्षाला विचारून घ्या, असे सुचवले. आमच्याकडे दिवसभर घडलेल्या घटनांची माहिती तहसीलमधून दुसऱ्या दिवशी सकाळी येते, असे सांगितले.तिवसा तालुक्यातील दुर्घटनेची माहिती माध्यमांना दुपारी ला मिळाली असताना आपत्ती निवारण कक्षाला याची भनकही नव्हती. गतिमान शासनाच्या प्रशासनाचा संथ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला.

बातम्या आणखी आहेत...