आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातबारा काढण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याला बोलेरोने उडवले, शेतकरी मृत्‍युमूखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या बोलेरोच्‍या धडकेमुळे रामधन यांचा मृत्‍यु झाला. - Divya Marathi
या बोलेरोच्‍या धडकेमुळे रामधन यांचा मृत्‍यु झाला.
पुसद (यवतमाळ) - सातबारा काढण्यासाठी जात असतांना माघून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पासून 5 किमी अंतरावर असलेल्या अस्वीनपुर येथे ही घटना घडली.
 
आज सकाळी 8 वाजता रामधन सोमला राठोड (वय 65, रा. अश्विनपुर) हे शेतीचा सातबारा काढण्‍यासाठी पुसदकडे सायकलने चालले होते. वरुड येथील झोपडपट्टीजवळ आल्‍यावर त्‍यांना एक मित्र भेटला. त्‍यामुळे सायकलवरुन खाली उतरत ते त्‍याच्‍यासोबत पायी चालु लागले. तेवढ्यात माघून येत असलेल्या बोलेरोने रामधन यांना अचानक धडक दिली.
 
बेसावध असलेल्‍या रामधन यांना या धडकेमुळे जबर मार बसला. त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्‍यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून त्‍यांना मृत घोषित केले. रामधन यांच्‍या पश्‍चात 3 मुले व 3 मुली आहेत.
बातम्या आणखी आहेत...