दर्यापूर - तालुक्यातील कान्होली येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. ९) उघडकीस आली. देवानंद किसन वानखडे असे मृतकाचे नाव आहे. देवानंद यांनी गळफास लावल्याचे उघडकीस आल्यानंतर खल्लार पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.दोन एकर कोरडवाहू शेती असलेल्या वानखडे यांच्याकडे उसनवारी ५० हजार रुपये सोसायटीचे कर्ज असल्याचे कुटूंबीयांनी सांगितले.त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.