आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकीला कंटाळून अखेर शेतकऱ्याने घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- सततची नापिकी कर्जाच्या आेझ्यामुळे खचलेल्या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मलकापूर, येथे मंगळवारी (दि. २) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. विजय लेकराम खत्री (५०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

खत्री यांच्याकडे दोन एकर कोरडवाहु शेती आहे. यातूनच ते मुलीचे शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मागील चार पाच वर्षांपासून सततची नापिकीने डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. शासन कर्ज माफ करेल या आशवेर असतानाच दोन दिवासांपूर्वी बँकेने त्यांचे कर्ज पुनर्गठन नाकारल्याने ते पूर्णपणे खचल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यातूनच त्यांनी मंगळवारी मध्यरात्री गळफास लावला. त्यांच्या पश्चात तीन मुली पत्नी असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...