आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्येस मुख्यमंत्रीच जबाबदार; नागपुरात पोलिसांकडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध खून आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी बर्डी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात मलकापूर येथून १ मार्चला निघालेली िवश्वासघात दिंडी १५ िजल्हे आणि १८ तालुक्यांचा प्रवास करून मंगळवार, १५ ला नागपुरात पोहोचली. धरमपेठेतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देऊन दिंडी निषेध करणार हाेती. नागपुरात आलेली दिंडी आमदार निवासात मुक्कामाला थांबली. तिथून कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाण्यास निघाले असता पोलिसांनी भेट घेतली. अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री गावात नाही. त्यामुळे निवेदन देण्याची िवनंती केली. मात्र पाटील यांनी पोलिस ठाण्यात जाऊन मुख्यमंत्र्यांविरुद्ध खून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत केली.
बातम्या आणखी आहेत...