आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज परताव्यापासून शेतकरी अजून वंचितच, जिल्हा बँकांत कोट्यवधी रुपये अडकले,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांतील २७ मध्यवर्ती सहकारी बँकाकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रूपयांपैकी एकाही नव्या पैशाचा परतावा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांचे असे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाच्या रकमेतून ते टक्के एवढी रक्कम भाग भांडवल म्हणून वजा करण्यात येते. मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत या भाग भांडवलाच्या रकमेवरील साधे व्याजही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाही.
या संदर्भात अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बबलू उर्फ अनिरूध्द देशमूख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, राज्यातील जिल्हा बँकांत पीक कर्जातून भाग भांडवल जमा केले जाते. काही बँकामध्ये टक्के तर काही ठिकाणी टक्के तर काही जिल्हा बँकांत टक्के रक्कम भाग भांडवल म्हणून जमा करून घेतात. सध्या जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कोणतीही जिल्हा बँक शेतकऱ्यांना ही रक्कम तसेच त्यावरील व्याज देऊ शकत नाही असेही देशमुख यांनी सांगितले.

चारवर्षात ११०० कोटी जमा : सहकारविभागाच्या वार्षिक अहवालातील नोंदीनुसार मागील चार वर्षात राज्यातील २७ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ३३ लाख शेतकऱ्यांना ५६ हजार ५८५ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटले. कर्जाच्या या आकडेवारीनुसार सुमारे ११३१ कोटी रूपयांची रक्कम शेतकऱ्यांचे भाग भांडवल म्हणून सहकारी बॅंकामध्ये जमा आहे. जमा असलेल्या रकमेचा हा आकडा केवळ मागील चार वर्षातील आहे.
साधारणत:४० ते ५० वर्षापासून सहकारी बॅंकामार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा होतो आहे. मात्र, सहकारी बॅंकांमध्ये जमा असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या या रकमेचा आजपर्यंत कोणताही हिशेबच शेतकऱ्यांना मिळालेला नाही हे सार्वत्रिक वास्तव प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. भविष्यात ही रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

कापसाच्या चुकाऱ्याची कथा :
कापुस एकाधिकार योजनेत शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे विकलेल्या कापसाच्या विक्रीपोटी देण्यात येणाऱ्या मोबदला रकमेतून या पुर्वी टक्के रक्कमेची कपात व्हायची. शेतकऱ्यांच्या घामाचा हा मोबदला परत मिळविण्यासाठी २००५-०६ च्या दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. त्यानंतर तेव्हांचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या २००६ च्या विदर्भ दौऱ्यापुर्वी तात्कालीन राज्य सरकारने शेतकरी पॅकेज मध्ये या तीन टक्के रक्कमेचा समावेश करून ही रक्कम परत केली होती.
रत्नागिरी बँकेचा आदर्श : शेतकऱ्यांना लाभांश देण्यात रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक आघाडीवर आहे. मागील पाच वर्षात दरवर्षी बँकेने शेतकऱ्यांना १५टक्के प्रमाणे लाभांश दिला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला १० कोटी निव्वळ नफा झाल्याचे बँकेचे संचालक दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

तोट्यामुळे अडचण
^शेतकऱ्यांच्या भाग-भांडवलावरील लाभांशरुपी परतावा मिळतो. मात्र हे सर्व नफा -तोटा गणितावर अवलंबून असते. बँकेला नफा झाला तर वार्षिक १५ टक्के लाभांशाने परतावा दिला जातो. बहुतांश जिल्हा बँका तोट्यात असल्याने हा परतावा मिळालेला नाही. हा परतावा मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्याला सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. - दीपकपटवर्धन, तज्ज्ञसंचालक, पतसंस्था फेडरेशन

वर्ष कर्जवाटप
२०१२-१३ १२५०७
२०१३-१४ १३६२३
२०१४-१५ १४४२३
२०१५-१६ १६०३२