आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचोली येथे नऊ जणांना फवारणीतून झाली विषबाधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे/अमरावती - तालुक्यातील चिंचोली (झाडगाव) येथील तब्बल नऊ शेतकरी शेतमजुरांना कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा झाली असून दृष्टिदोष निर्माण झाल्याची घटना उघडकीस आली. या बाधितांवर वर्धा, पुलगाव येथे उपचार करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधेचे प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मात्र अशा घटना झाल्याचे सुरुवातीला सपशेल नाकारले होते. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक रुग्ण वर्धा येथील विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. 
 
यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधेचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकीय आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सुरुवातीला विषबाधा झाल्याच्या घटना नाकारणाऱ्या यंत्रणेने जिल्ह्यात १८५ विषबाधेच्या घटना उघडकीस आल्याचे कबूल केले. दरम्यान चिंचोली (झाडगाव) येथील नऊ शेतकरी-शेत मजुरांनाही विषबाधा होऊन दृष्टिदोष निर्माण झाल्याची घटना चव्हाट्यावर आल्याने प्रशासकीय यंत्रणा या घटना दडपून ठेवत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. चिंचोली येथील या बांधितांना आक्टोबरपासून विषबाधा झाल्याचे उघड झाले. यात किशोर जाधव, दिवाकर पारिसे, प्रशांत बोके, दिनेश ठाकरे, गजानन मडवे, नारायण मलीये, रुपेश नेहारे , संजय राऊत, नरेश इरपाते या शेतकरी-शेतमजुरांना आक्टोबरदरम्यान फवारणी दरम्यान विषबाधा झाली. काही रुग्णांनी सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली असून, काही रुग्णांवर सेवाग्राम रुग्णालय, सावंगी मेघे तर काहींवर पुलगाव येथील खासगी डॉक्टरकडे उपचार करण्यात आले. दरम्यान या रुग्णांची प्रकृती सुधारत असली तरी गावात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
स्पष्ट दिसत नाही 
मला रुपेश नेहारे याला विष बाधा झाली. डोळ्यांनी दिसणेही बंद झाले होते. दरम्यान मी खासगीत रुपेशला सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार घ्यावा लागला अजूनही दूरचे फारसे दिसत नाही. 
- प्रशांत बोके, शेतमजूर, चिंचोली (झाडगाव) 
 
अनेक रुग्ण वर्धेत 
मी अल्पभूधारक शेतकरी. सुरुवातीला खासगी नंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात इलाज सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील बरेच लोक तेथे उपचारासाठी येताना दिसत आहेत. 
- किशोर जाधव, शेतकरी, चिचोली झाडगाव 
 
माहिती मिळू शकली नाही 
ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यरत असल्याने या घटनेची माहिती मिळाल्याने माहीत होऊ शकले नाही. आता वरिष्ठांना त्वरित कळवतो, असे चिंचोली झाडगाव येथील तलाठी कडू यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...