आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कासाठी शेतकरी पुन्हा उतरले रस्त्यांवर, चक्काजाम आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शासनाच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात सुकाणू समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच तालुक्यात आंदोलन करून निषेध करण्यात आला. सुकाणू समितीच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकरी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. 

शासनाने कर्जमाफी केल्यानंतरही अद्यापर्यंत कर्जवाटपाला गती येऊ शकली नाही. कर्जमाफीच्या नावाखाली करण्यात आलेल्या मलमपट्टीच्या उपायोजनांच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभर सुकाणू समितीच्यावतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटनेच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, तिवसा, रहाटगाव, येथे रास्तारोको आंदोलन करून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. रहाटगाव टी-पाईंट येथे राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी उर्वरित.पान

पोलिसांच्या वाहनाने अडवली रुग्णवाहिका 
सुकाणूसमितीकडून रास्ता रोको सुरू असताना अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने चाललेल्या अॅम्बुलंसला आंदोलनकर्त्यांनी वाट मोकळी करुन दिली. मात्र तिवसा येथून अमरावतीकडे चाललेल्या दुसऱ्या अॅम्बुलंसची वाट पोलिसांच्या वाहनाने अडविल्याचा प्रकार समोर आला. राज्य राखीव दलाचे वाहन अॅप्रोच रस्त्यावर उभे करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान ही अॅम्बुलंस अॅप्रोच रस्त्याने आल्याने तेथे उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनांमुळे अडकली होती. याचा रुग्ण नातेवाईकांना त्रास झाला. 
बातम्या आणखी आहेत...