आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीचा ट्रॅक्टर थेट जिल्हाधिकारी कक्षासमोर; खरेदी केंद्र सुरू करा, अन्यथा मरणाची परवानगी द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बारादाना संपल्याचे क्षुल्लक कारण सांगून नाफेडने जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसोबतच काँग्रेसच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) तुरीच्या पोत्यांनी भरलेला ट्रॅक्टर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आणून तेथेच तुरीचे मोजमाप करून प्रतिकात्मक तूर खरेदी केंद्र सुरू केले.
 
अनपेक्षितपणे झालेल्या या तूर खरेदी आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.दरम्यान,जिल्ह्यातील नाफेड एफसीआयचे तूर खरेदी केंद्र बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयातच तूर खरेदी सुरू करा, अन्यथा शेतकऱ्याला इच्छा मारणाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
 
यावर्षी कोणत्याही पिकाला समाधानकारक भाव मिळाले नाही.सोयाबिनला गतवर्षीच्या तुलनेत भाव कमीच मिळाला.तिच स्थिती कापसाची झाली . त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा तुरीवरच एकवटल्या होत्या. यंदा तुरीचे भरघोस उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळू शकला नाही. मागील वर्षी जिल्ह्यात तुरीला प्रतिक्विंटल ते ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले होते. यंदा मात्र खासगी बाजारात हजार ८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे. यातच शासनाने नाफेडमार्फत सुरू केलेली तूर खरेदी पाचव्या दिवशीच बारदाना संपल्याचे अविश्वसनीय कारण सांगून बंद केली. नाफेडव्दारे तूर खरेदी झाली तर शेतकऱ्याला किमान हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले असते मात्र नाफेडचेही खरेदी केंद्र बंद पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झाला. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अंत्यत केविलवाणी झाली आहे. यात शासन शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी एक प्रकारे छळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य तसेच काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश साबळे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही शेतकरी तुरीच्या पोत्यांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन थेट जिल्हाकचेरीत पोहोचले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरमधून तुरीचे पोते खाली टाकले. याचठिकाणी तुरीचे मोजमापही सुरू केले. प्रतिकात्मक खरेदी केंद्रच याठिकाणी थाटण्यात आले होते. शासन नाफेड किंवा एफसीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तूर खरेदी करू शकत नाही, त्यामुळे ते केंद्र कायमस्वरुपी बंद करावे आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरीत कार्यालयातच शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी यावेळी केली.
 
या समस्येवर तातडीने मार्ग काढता शासनाने चालढकल केली तर आम्ही आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी दिला. यावेळी प्रकाश साबळे यांच्यासह हरिभाऊ मोहोड काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीणसिंग परदेशी यांच्यासोबत चर्चा केली. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने बारदान्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
 
दरम्यान, नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून तूर मोजणीची प्रतीक्षा करीत आहेत. आपला नंबर आज लागेल,उद्या लागेल या आशेवर तो रोज चकरा मारत असताना नाफेडने प्रारंभ जिल्ह्यातील चार केंद्रांवरील तुरीचा दर्जा निकृष्ट असल्याचे सांगून येथील खरेदी बंद केली होती. त्या पोठोपाठ आता खरेदी केलेली तूर साठवून ठेवण्यासाठी बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून पुन्हा एकदा तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात आजचे अनोखे आंदोलन करण्यात आले.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, एेनवेळी पोलिसांची झाली पंचाईत
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...