आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ/परतवाडा - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही  घटना केळापूर तालुक्यातील वाठोड येथे दि. १९ रोजी सकाळी ११ वाजताघडली.  वासुदेव विठोबा रोंघे  (वय ६०) आणि  वासुदेव  कृष्णराव राऊत  (वय ६५ )अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. तर  कासमपूर येथे अण्णासाहेब विनायक काळे (४५) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २० ऑक्टोबरला दुपारी अडीचच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वाठोड येथील वासुदेव रोंघे यांच्याकडे पाच एकर जमीन असून तिच्यावर मध्यवर्ती बँक आणि अडणी सोसायटीचे ८० हजारांचे कर्ज होते. 
बातम्या आणखी आहेत...