आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत सहा जिल्ह्यात वाढली ‘शेतकरी आत्महत्यां’ची तीव्रता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मागील तीन वर्षात शेतकरी आत्महत्येची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन वर्षात ५९४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. मध्यंतरी कमी असलेले शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दहा वर्षापूर्वीप्रमाणे असल्याचे आकडेवारीवरुन निदर्शनास येत आहे. 


शेतीचे चित्र बदलत जीवनात आनंदाचे दिवस येतील या अाशेने देशातील नागरिकांनी परिवर्तनाचे अस्त्र उगारले. एका झटक्यात अनेक वर्षांपासून असलेल्या सरकारला सत्तेतून खाली खेचले. सत्ता बदलानंतर चांगले दिवस येण्याची प्रतिक्षा संपली नसल्याचे दिसून येत आहे. केंद्रात, राज्यात सरकार बदलल्या नंतर २०१५, २०१६ २०१७ या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम वर्धा आदी सहा जिल्ह्यात तीन वर्षात तब्बल हजार ५९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र यातील केवळ हजार ७५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र असल्याची नोंद शासन दरबारी आहे. सहा जिल्ह्यांपैकी अमरावतीत सर्वाधिक ८९२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. 


यवतमाळमध्ये ८८२ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. सरकार बदलले मात्र शेती विषयक धोरणांमध्ये कोणताच बदल झाला नसल्याचे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन दिसून येत आहे. सोयाबीनचे पडलेले भाव, बाजार समित्यांमध्ये हमीभावा पेक्षा कमी दराने होणारी खरेदी, बोगस बियाणे, सावकारी कर्ज, बँकांचे कर्ज, खर्च अधिक अन् उत्पादनाला भाव कमी अशी विदारक स्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करीत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र राज्यात कर्जमाफीच्या याद्या तयार होत नसल्याचे चित्र आहे. पाच महिन्यानंतर याद्याच तयार नाही, तर कर्जमाफी मिळणार तरी कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी आत्महत्येच्या गर्तेतून कधी काळी संपन्न असलेला विदर्भ कधी बाहेर पडेल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 


अमरावती आणि यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या 
तीन वर्षात अमरावती यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात तीन वर्षात ८९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ४८६ पात्र ठरल्या. सर्वाधिक आत्महत्या २०१६ मध्ये झाल्याची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात तीन वर्षात एकूण ८८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी ४१७ पात्र ठरल्या. 

बातम्या आणखी आहेत...